रावेर यावल भागाची जलदायिनी सुकी नदी येथे आ. शिरीष चौधरी यांचे हस्ते जलपुजन व कृतज्ञता

सावदा प्रतिनिधी –

आज दि 07 रोजी रावेर यावल भागाची जलदायिनी सुकी नदी चे जलपुजन व कृतज्ञता करण्यात आली.
रावेर यावल भागाची जलदायिनी सुकी नदी व त्या नदीवरील गारबर्डी येथील धरण पूर्ण भरुन वाहत असल्याने शेतकरी राजा खूप सुखावला आहे.

त्यानिमित्त आज आ. शिरीष चौधरी व खिरोदा-चिनावल पंचक्रोशीतील
शेतकरी व समाजिक कार्यकर्ता समवेत सुकी नदी चे जलपूजन केले. तसेच ह्या धरणा चा प्रकल्प प्रत्यक्षात आणला असे स्व. लोकसेवक बाळासाहेब चौधरी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याप्रसंगी जि.प. सदस्या सुरेखाताई पाटील, बापू पाटील, माजी पं.स. सभापती यावल लिलाधरशेठ चौधरी, युवानेते धनंजय चौधरी, पं. स. सदस्य योगेश सोपान पाटील, सर्फराज तडवी, हमीदभाई तडवी, रामेशदादा महाजन, विजय महाजन रोझोदा, तुकाराम बोरोले, किशोर चौधरी (गम्पा शेठ), गुणवंत टोंगळे, मुरलीधर राणे, लोहारा सरपंच लियाकत जमादार, संजय जमादार, जावेद जनाब, जिया सर, देविदास हडपे, संजय चौधरी, सुधाकर झोपे, जितेंद्र पाटील, उपसरपंच दिपक धांडे, कामिल शेठ, पिंटू पवार, चंद्रकांत भंगाळे, अनिल लढे, सुनील फिरके, सुनील कोंडे, डॉ राजेंद्र पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, गंभीर तडवी, आर. के. चौधरी, भरत कुवर, संतोष बंजारा तसेच पत्रकार संतोष नवले, योगेश सैतवाल व परिसरातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!