नैसर्गिक आपत्ती मुळे मृत्यू झालेल्या चेतन पाटील यांच्या कुटुंबियांना आ. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते ४ लाखांचा मदतनिधी धनादेश.

सावदा – प्रतिनिधी

सावदा ता. रावेर येथील क्रांती चौक भागात काही महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे झाडाची मोठी फांदी पडून मेसचालक
चेतन सुभाष पाटील वय ३९ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पच्यात आई वडील पत्नी व एक चिमुकली मुलगी
असून त्यांना शासनाकडून काही न काही मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत आ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज रोजी त्यांच्या कुटुंबियांना ४ लाखांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोजखान पठान, शिवसेना तालुका उपप्रमुख शाम पाटील, शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, मंडळ अधिकारी संदिप जैसवाल, तलाठी शरद पाटील, फौजदारी लिपिक प्रवीण पाटील, निलेश खाचणे, शरद भारंबे, सिद्धांत लोखंडे, अभिजित मिटकर, मनिष भंगाळे, गौरव भैरवा, हे उपस्थित होते,

सावड्यात लवकरच सुरू करणार ऑक्सिजन प्लॅन्ट

आ. चंद्रकांत पाटील यांनी सावदा येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णलयामध्ये भेट देऊन पाहणी केली असता डिसेंबर अखेर काम पूर्ण होईल असे समजते. तसेच आ. चंद्रकांत पाटील यांनी कोविड ची तिसरी लाट आली असता आपल्या कडून पेशंट ला तत्पर सेवा देता यावी, पेशंट ची ऑक्सीजन साठी कुठेही तारांबळ उडू नये यासाठी सावदा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्याबाबत सुध्दां चर्चा केली असून लवकरच सावदा येथे ऑक्सीजन प्लॅन्ट उभारण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!