दर वर्षी प्रमाणे यंदाही सावदा येथे आषाढी एकादशीनिमित्ताने श्री विठ्ठल रुखुमाईची महापूजा

सावदा प्रतिनिधी

येथील गांधी चौक परिसरातील विठ्ठल मंदिरात दर वर्षी प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त महापूजा वै.जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे गादीपती ह.भ.प.धनराज महाराज अंजाळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी गांधी चौकातील सतीश महाराज जोशी यांनी पुजा ठन केले. तसेच शहरातील भक्तगण हजर होते. आरती झाल्यानंतर १ क्वींटल २५ किलो साबुदाणा खिचडीचे वाटप, व माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे कडून १० कॅरेट केळी व पेढे, राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. या वेळी शहरातील सर्व बांधवांचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!