केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी दोन दिवसीय 22व्या फिंगर प्रिंट ब्युरोच्या संचालकांच्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन केले

नवी दिल्ली,

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी फिंगर प्रिंट ब्युरोच्या संचालकांच्या 22व्या दोन दिवसीय अखिल भारतीय परिषदेचे 28 ऑॅक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे ऑॅनलाईन पद्धतीने उद्घाटन केले.

उद्घाटन कार्यक्रमाला विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा), गृह मंत्रालय व्ही एस के कौमुदी आणि राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचे संचालक राम फल पवार, राज्य फिंगर प्रिंट ब्युरोचे संचालक आणि राज्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शिक्षण तज्ञ वैज्ञानिक फिंगर प्रिंट क्षेत्रातील इतर मान्यवर ऑॅनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

मिश्रा यांच्या हस्ते भारतीय फिंगरप्रिंट-2020 या 24 व्या वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले. गुन्हे तपासात फिंगरप्रिंटचा वापर करण्याविषयीचे हे प्रकाशन आहे.विविध माहिती तंत्रज्ञान अप्लिकेशन्स विकसित आणि लागू करण्यासाठीच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या प्रयत्नांचे देखील त्यांनी कौतुक केले. तसेच वैज्ञानिक तपासाच्या गराजेवर देखील त्यांनी भर दिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!