श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त पारोळ्यात आनंदोत्सव साजरा….

पारोळा प्रतिनिधी –

अयोध्येत प्रभु श्रीराम यांचा मंदिर लोकार्पण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि २२ जानेवारी रोजी जगभरात सर्वत्र विविध उपक्रम,कार्यक्रम, मिरवणुक,शोभायात्रा आयोजित करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणून पारोळा शहरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला.
येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल,दुर्गा वाहिनी तर्फे सकाळी ९ वाजता छ्त्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ) येथून भव्य मिरवणुकीला सुरवात होऊन मुख्य बाजारपेठेसह प्रमुख मार्गावरून मोठे श्रीराम मंदिर येथे सांगता झाली.मिरवणुकीत विश्व हिंदु परिषद,दुर्गा वाहिनी तर्फे लहान-मोठ्या मुलींनी दंड प्रात्याशिक ठिक-ठिकाणी सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत विश्व हिंदु परिषद, दुर्गा वाहिनी,नारीशक्ती यांच्यासह शहरातील सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान व्यापारी, लोकप्रतिनिधी,नागरिकांनीकडून ठिक ठिकाणीं महाप्रसाद,थंड पेय वितरण करण्यात आले.
तसेच सायंकाळी ४ ते ६ या वेळेत विश्व हिंदु परिषद,दुर्गा वाहिनी तर्फे आझाद चौकात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,यात ७० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.लहान व मोठ्या गटात स्पर्धकांना प्रथम, द्वितीय,तृतीय याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात आले.तर “जय श्री राम” नामस्वरूपात दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.दरम्यान,अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिर व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वत्र शहर राममय होऊन चैतन्य निर्माण झाले होते.

संकट मोचन मारुती मंदिर

  • येथील कजगांव नाक्यावरील नवसाला पावणारा संकट मोचन मारुती मंदिरावर व्यापारी वर्ग व भक्तगणांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
  • सकाळी नऊ वाजता प्रभु श्रीराम यांचा प्रतिमेचे पूजन व्यापारी वर्ग, मंदीराचे भक्तगणांसह मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष रविंद्र पाटील यांचा हस्ते झाले.प्रभु श्रीराम व हनुमान यांचे गितगायन झाले. त्यानंतर दहा वाजता कजगांव नाका व्यापारी वर्ग,मंदिराचे भक्तागण व हमाल संघटनेकडून भगव्या वेशभूषेत मंदिरापासून डि जे वर मिरवणूक काढून शिवतीर्थ,मुख्य बाजारपेठ, नगरपालिका चौक,तलाव गल्लीतून परत मंदिरावर तिची सांगता करण्यात आली.मंदिरावर भक्तांकडून श्रीराम यांचा गितांवर जल्लोष होऊन अयोध्येतील प्रभु श्रीराम यांचा मुर्ती प्राणप्रतिष्ठा शुभमुहूर्ता प्रमाणे १२.२९ ला पारोळा लोकदर्पण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, महाआरती करण्यात आली. यावेळी लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
    दरम्यान मिरवणुकांत पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!