सावदा येथील मनाली हॉटेल मध्ये चोरी – लाख रुपयाची दारू व बियर लपास

सावदा प्रतिनिधी

येथील फैजपूर रोड वरील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबार मध्ये रात्री चोरट्यांनी दरोडा टाकून सर्व दारू व बियर चे बॉक्सेस चोरून नेल्याची घटना आज घडली. यात काही लाख रुपयाची दारू चोरल्याची प्राथमिक माहिती आहे.

हॉटेलच्या उत्तरेच्या बाजूस असणाऱ्या खिडकीला तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर हॉटेल मधील सी सी टिव्ही केमेरे फोडून डीव्हीआर घेऊन गेले नंतर हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बीयरचे संपूर्ण बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्या. आज पहाटे ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली . याची माहिती मिळताच मनली हॉटेल चे संचालक मनोज नेमाडे, विनोद नेमाडे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, पंकज येवले, सागर पाटील, सागर बेंडाळे, हजर झाले . माहिती मिळताच सावदा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले सह उमेश पाटील, संजू चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!