पंजशीरवरील तालिबानच्या कब्जाच्या दाव्याला बंडखोर गटाने फेटाळले

नवी दिल्ली,

पंजशीरमधील बंडखोर गटाने तालिबानकडून राज्यावर कब्जा केल्याच्या दाव्याचे खंडन केले असून नॅशनल रेसिस्टेंस फ्रंट (एनआरएफ) ने एका टिवीटमध्ये म्हटले की तालिबानचा पंजशीरवरील कब्जा करण्याचा दावा खोटा आहे.

एनआरएफने टिवीटमध्ये म्हटले की तालिबानचा पंजशीरवर कब्जा करण्याचा दावा खोटा असून आमचे सैन्य लढाई सुरु ठेवण्यासाठी खोर्‍यातील सर्व रणनीतीक मोर्चावर उपस्थिती आहेत. आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांना आश्वस्त करत आहोत की जो पर्यंत न्याय आणि स्वतंत्रता मिळत नाही तो पर्यंत तालिबान आणि त्यांच्या सहयोगींच्या विरोधातील संघर्ष सुरु राहिल.

तालिबानने दावा केला की त्यांनी शेवटी पंजशीरवर पूर्णपणे केब्जा केलेला आहे. खामा न्यूजने आपल्या एका बातमीमध्ये सांगितले की कार्यवाहक संस्कृति आणि माहिती मंत्री आणि तालिबानी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने एका निवेदनात म्हटले की राष्ट्रव्यापी सुरक्षेच्या स्थापनामध्ये आमचे प्रयत्न यशस्वी राहिले आहेत आणि राज्याला अल्लाहच्या मदतीने आणि लोकांच्या समर्थनाने मिळविले आहे.

पंजशीर राज्यात मागील सात दिवसां पासून तालिबान आणि प्रतिरोधी दलांमध्ये मोठा संघर्ष होत आहे. या दरम्यान दोनीही पक्षांचे अनेक लोक मारले गेले आहेत.

निवेदनानुसार काही प्रतिरोधी दलाचे लोक मारले गेले आहेत तर अन्य जण प्रांत सोडून पळून गेले आहेत. आम्ही पंजशीरमधील लोकांना भेदभावपूर्ण व्यवहाराच्या आधीन न होण्याचे आश्वासन देत आहोत. ते आमचे भाऊ असून संयुक्तपणे अफगाणिस्तानच्या विकासासाठी काम करुत.

बातमीनुसार पंजशीर राज्यात रविवारी रात्रीच्या संघर्षात प्रतिरोध दलांचा एक प्रमुख कमांडर जनरल अब्दुल वोदोद आणि सैन्याचे प्रवक्ते फहीम दशती मारले गेले. या आधी प्रतिरोधी दलाचे सह नेते अहमद मसूदने तालिबान बरोबर चर्चाचा प्रस्ताव दिला होता ज्याला तालिबानने अस्वीकार केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!