टायगर स्कूल येथे श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रम..

पारोळा प्रतिनिधी –

पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल मध्ये श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांकडून रामरक्षा स्तोत्र पठण करून प्रभू श्रीरामाविषयी माहिती देण्यात आली.श्रीरामाच्या सूर्य तिलक करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राम-लक्ष्मण सीता यांच्या रूपात वेशभूषा परिधान केली होती.त्यांचे ही पूजन व स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रभू श्रीराम यांच्या विषयी अधिक ज्ञान मिळावे यासाठी जनरल नॉलेज परीक्षा, चित्रकला स्पर्धा,रामलीला नाटिका आदी ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या.यावेळी टायगर इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष रविंद्र पाटील,संचालिका रूपाली पाटील,प्राचार्य अजिम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, व्यवस्थापक मंगेश पवार,श्रीकांत खैरनार व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!