म्हसवे शिवारात गॅस सिलेंडरांचा स्फोट..

अडीच लाखाचे नुकसान, एकावर गुन्हा

पारोळा प्रतिनिधी –

तालुक्यातील म्हसवे शिवारात गॅस ओमनीत भरतांना गॅस सिलेंडरांचा भिषण स्फोट होऊन त्यात अडीच लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली, याबाबत संशयित एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत विश्वजीतसिह गिरासे (पुरवठा निरीक्षक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,म्हसवे शिवारातील एका मोकळ्या जागेत अवैध बेकायदेशीर गॅस सिलेंडर बाळगून,गॅस ओमिनींमध्ये भरत होते,गॅस भरतांना अचानक भिषण स्फोट झाला,यात दोन्ही ओमनी गाडी ज्यांची किंमत २ लाख रुपये आहे तर ९ जळालेल्या तर १२ चांगल्या असे ५० हजार आठशे रुपयांचे २१ गॅस सिलेंडर असे एकूण २ लाख ५० हजार आठशे रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान,या भीषण आगीमुळे व गॅस सिलेंडरांमुळे पारोळा व एरंडोल येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन आग आटोक्यात आणली.

मानवी जीवितास हानी, परीसरात व सार्वजनिक आरोग्य धोक्यात टाकत निष्काळजीपणाने बेकायदेशीर गॅस सिलेंडर बाळगून या सर्व घटनेस कारणीभूत म्हणून म्हसवे येथील संशयित खंडेराव रामराव पाटील उर्फ मोठाभाऊ यासह इतर जणांवर फिर्यादीवरुन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!