क्षयरोग नियंत्रण सप्ताहांतर्गत जिल्ह्यात पाच लाख ५८ हजार १९० नागरिकांचे सर्वेक्षण..तर सर्वेश्वर संस्थेने २४० घरांना दिल्या गृहभेटी..

छायाचित्रात वीट भट्टी वरील कामगार यांची आरोग्य तपासणी करताना वरिष्ठ पर्यवेक्षक श्री भगवान चौधरी व सर्वेश्वर संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील.

दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी प्रकाश पाटील

क्षयरोग नियंत्रण सप्ताहांतर्गत मोहिमेत तब्बल २७९ आरोग्य टीमच्या माध्यमातून व पारोळा येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था मिळून ५ लाख ५८ हजार १९० नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत तारीख १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया,जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार,जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ.नागोजिराव चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण शोध मोहीम यशस्वी करण्यात आली.

जिल्हा समन्वयक किरण कुमार निकम यांनी प्रसिद्धीस दिले की,मोहिमेअंतर्गत तब्बल २७९ आरोग्य टीमच्या माध्यमातून व पारोळा येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था मिळून ५ लाख ५८ हजार १९० नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली.यात ४६३७ संशयित रुग्ण आढळले.क्षयरोग शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५ तालुक्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा सेविका अशा टीम च्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली.

छायाचित्रात पेट्रोल पंपावरील कामगार यांची आरोग्य तपासणी करताना वरिष्ठ पर्यवेक्षक श्री भगवान चौधरी व सर्वेश्वर संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील

क्षयरोग हा बरा होणारा आजार असून याबाबत समाज मनात भीती पसरली आहे.शासन वेळोवेळी क्षयरोगाबाबत नागरिकांना जागरूक करीत असते.तसेच प्रत्येक तालुका व ग्रामीण भागात सामान्य रुग्णालयात या आजाराबाबत समुपदेशन केंद्र व उपचार सेवा देण्यात आली आहे.आरोग्य तपासणी दरम्यान आरोग्य कर्मचारी व सेवाभावी संस्था यांनी लोकांच्या मनातील भीती दूर करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा असे सांगून गावपातळीवर आजाराबाबत नागरिकांची जागृतता करण्यात आली. यावेळी डीपीएस व्हि.बी पाटील,संजय पाटील,नितीन मुळे यांनी सहकार्य केले.

सर्वेश्वर संस्थेकडून २४० घरांना गृहभेटी गेल्या चार वर्षापासून कुटीर रुग्णालय पारोळा अंतर्गत सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील व त्यांचे सहकारी क्षयरोग निर्मूलन शोधमोहिमेत सहभाग घेतला.


मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पारोळा शहरातील राजीव गांधी नगर,इंदिरा नगर,विटभट्टी,पेट्रोल, फटाका फॅक्टरी वरील कामगार यांची आरोग्य तपासणी करीत २३२१ जणांची तपासणी करीत २४० घरांना गृहभेटी देत त्यात संशयित ९५ तर बाधित २ रूग्ण आढळून आले.
तर पारोळा तालुक्यात १५ आरोग्य टीम च्या माध्यमातून १३ रुग्ण बाधित आढळून आले.
या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी,कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश साळुंखे,डॉ.प्रांजली पाटील डॉ.स्वप्नील जाधव,डॉ.तुषार पाटील डॉ.राहुल पवार,डॉ.देवयानी शिंदे,डॉ.सी आर देसले,आरोग्य सहाय्यक आर.जे सातपुते,तालुका पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पाटील,तालुका लेखापाल भुषण पाटील,वरिष्ठ पर्यवेक्षक भगवान चौधरी,मलेरिया तालुका पर्यवेक्षक डी.बी.राजहंस,प्रयोग शाळा पर्यवेक्षक राजेंद्र चंद्रात्रे,सुमित शेलकर,अनिल वाणी,राजू वानखेडे,दीपक सोनार,भुषण पाटील,प्रसाद राजहंस यांनी सहकार्य केले.

आपल्या स्थानिक बातम्यां करिता दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!