सौ.सु.ग.देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत..

जळगाव प्रतिनिधी – ( सागर पाटील सर )

शि.प्र.मंडळ संचलित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये इ.१ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करून शाळेत प्रवेश देण्यात आला . कोरोना महामारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह दिसून आला. पालकांकडून संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. शासनाच्या नियमानुसार शालेय परिसर व वर्गखोल्या यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील या दृष्टिकोनातून बाकांची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांना मास्क लावणे हाताला वेळोवेळी सॅनिटायझर लावणे इ. सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!