रोहित जिनिंगला आग – लाखोचे नुकसान….

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

विद्युत डीपी ला अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटने येथील अमळनेर रस्त्यावरील रोहित ऑईल मिल जिनिंगला आग लागून लाखोंचे नुकसान झाले,परंतु तात्काळ जिनिंगच्या वॉटर सप्लायच्या पाण्याने लागलेली आग काही प्रमाणात आटोक्यात आणून मोठी हानी टळली,मात्र कापूस,सरकीला आग लागून तसेच सदर मोटारी जळाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती जिनिगचे संचालक अनिल सोमाणी यांनी दिली.दरम्यान पारोळा अग्निशामक बंब नादुरुस्त असल्याने अंमळनेर व धरणगाव येथील अग्निशामक बंबास पाचारण करून आग आटोक्यात आली यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक राजू जाधव,गंभीर शिंदे,किशोर भोई, राहुल पाटील, विजय भोई,यांनी भेट दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!