पारोळा येथे विद्युत तारा तुटल्याने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू….

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

पारोळा येथील मुख्य बाजारपेठेत महाराष्ट्र रेस्टॉरंट जवळ एका भाजीपाला विक्रेत्याच्या अंगावर अचानक विद्युत तार तुटुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दिनांक १९ रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार परमेश्वर उर्फ आबा संतोष महाजन वय ४२, रा.पेंढारपुर हे नेहमी प्रमाणे बाजारपेठेत हातगाडीवर भाजी पाल्याचे दुकान लावत असतात. दिनांक १९ रोजी दुपार पासुन रिमझिम पाऊस सुरु होता. सायंकाळी भाजीपाला विकून पैश्याचा हिशोब लावत असतांनाच अचानक मेन विजेच्या ताराच्या भाग मधुनच खंडित होऊन परमेश्वर महाजन यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी घटनास्थळी नागरिकांनी सैरावैरा धावत काठी ने ताराबाजुला सारली तर काहींनी महावितरण कार्यालयास फोन करून घटने विषय माहिती दिल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला.दरम्यान,परमेश्वर महाजन यांना उपचारासाठी एका खाजगी डॉक्टरांकडे दाखविले व तेथून रुग्णवाहिकेतुन कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
मोठा अनर्थ टळला…
बाजार पेठेत भाजीपाला व किराणा साहित्य घेण्यासाठी संध्याकाळी गर्दी होत असते. परंतु दुपार पासुन रिमझिम पाऊस सुरु असल्याने संध्याकाळी गर्दी कमी होती. अन्यथा मोठा अनर्थ झाला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.दरम्यान,झालेल्या घटने विषयी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!