तरसोद जि . प . शाळेत विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत.

कोरोना काळातील शासकीय निर्बंध पाळत मास्क व विशिष्ट अंतर ठेवून केंद्रप्रमुख वाघे व ग्रेडेड मुख्याध्यापक ठोसरे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेटी देऊन सहर्ष स्वागत केले .

तरसोद जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचे शासनाच्या निर्देशानुसार सहर्ष स्वागत करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे असून प्रमुख अतिथी ग्रेडेड मुख्याध्यापक बाळकृष्ण ठोसरे होते . प्रारंभी ‘ इतनी शक्ति हमे देना दाता ‘ प्रार्थना मोजक्या विद्यार्थ्यांची घेण्यात आली .कोरोना काळातील शासकीय निर्बंध पाळत मास्क व विशिष्ट अंतर ठेवून केंद्रप्रमुख वाघे व ग्रेडेड मुख्याध्यापक ठोसरे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व चॉकलेटी देऊन सहर्ष स्वागत केले . तत्पूर्वी वर्गात विद्यार्थी येतांना प्रारंभी मनोहर बाविस्कर यांनी तापमानाच्या नोंदी व सुषमा पाटील आणि विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना सॅनेटराईज करण्यास सहकार्य केले . इयत्ता १ ली ते ४ थी च्या प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या औचित्याने मार्गदर्शन करतांना केंद्रप्रमुख वाघे म्हणाले की,” विद्यार्थ्यांचा सुमारे दोन वर्ष शाळेचा प्रत्यक्ष संबंध नसल्याने शिक्षकांनी ज्ञानरचनावाद पद्धतीने मातृपितृ वात्सल्याने वागून मनोरंजकपणे हसत खेळत अध्यापनाने विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पनांचे प्रथमतः दृढीकरण करून त्यांना शिक्षणात प्रवाहात आणावे असे आवाहन केले .मुख्याध्यापक ठोसरे यांनी प्रसासकीय नियमावली विद्यार्थ्यांना समजावून सांगीतली.इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचे विजय लुल्हे व निवृत्ती खडके, कल्पना तरवटे यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऊखर्डू चव्हाण व आभार प्रदर्शन सुषमा पाटील यांनी केले .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!