नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळेला मास्क,ऑक्सीमीटर, आणि थर्मामीटर भेट..

यावल – तालुका प्रतिनिधी ( सुरेश पाटील )

जळगाव नेहरू युवा केंद्र प्रमुख तथा यावल तालुक्यातील समन्वयक तथा शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी आपल्या स्वतःच्या मानधनातून यावल तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मास्क,थर्मल गन,ऑक्सीमिटर भेट म्हणून दिली.
जळगाव जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्‍या एकूण २ हजार ५६३ शाळा आजपासून (ता.१) सुरू होत आहेत.यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा तब्बल19 महिन्यांनी ऐकण्यास मिळणार आहे.कोरोना नियंत्रणात आल्यानंतर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू केल्‍या.यानंतर आता ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्‍यता दिली आहे.राज्य सरकारने याबाबत निर्णय घेत १ डिसेंबर2021पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत आहेत. परंतु कोविड महामारीची तिसरी लाट लक्षात घेता नेहरू युवा केंद्र समन्वयक तथा शिरसाड येथील युवा ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन ऑक्सीमीटर,थर्मल गन व सर्व विद्यार्थ्यासाठी मास्क त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद शाळेत जाऊन स्वतः प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क वाटप केले.तसेच प्रत्येकाला कोविड बद्दलची जनजागृती केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपालीताई इंगळे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य कलिमाताई तडवी,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्रदादा खंबायत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील मॅडम,शाळेचे शिक्षक राजाराम मोरे सर,शेख मेहबूब शेख बशीर सर,दीपक चव्हाण सर, सौ.अर्चना शिंदे मॅडम,किशोर पाटील सर, अविनाश पाटील सर आणि गावातील दीपक दादा खंबायत, विशाल दादा सोनवणे इत्यादी उपस्थित होते.तेजस पाटील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जात असतात.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

_________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण यावल तालुक्यातील बातमी 9822485311 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
सुरेश पाटील
यावल तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9822485311

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!