चुंचाळे येथील ग्रामसेविका यांना एक महिना न्यायालयीन कोठडी.!

जिल्हाधिकारी जळगाव यांचा आदेश..

शासकीय दप्तर न देण्याचा परिणाम

यावल – तालुका प्रतिनिधी ( सुरेश पाटील )

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामसेविका भुसावळ तालुक्यात किन्ही येथे कार्यरत असतानाच्या कालावधीचे शासकीय दप्तर सादर न केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना 30 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भुसावळ तालुक्यातील रहिवासी तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात न देणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत राऊत यांनी दिल्याने यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यक्षेत्रात मोठी उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणाऱ्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्यावर कठोर कारवाई करत एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी दिले.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामसेविका बाविस्कर या भुसावळ तालुक्यात किनी येथे कार्यरत असताना त्यांची तिने येथून यावल तालुक्यात बदली झालेली आहे परंतु बदली झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी,14 वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले आहे.प्रियंका बाविस्कर यांना वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा करून लेखी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली आहे.यात 10 दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी 4 नोव्हेंबरला दिले होता.तरी तरीसुद्धा ग्राम सेविकेने दप्तर सादर न केल्यामुळे या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान 30 दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश देण्यात आले.यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

_______________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण यावल तालुक्यातील बातमी 9822485311 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
सुरेश पाटील
यावल तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9822485311

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!