व्यवस्थेत हस्तक्षेप घडत राहतो तो घडण्यासाठीच साहित्यिकांनी निर्भयपणे प्रबोधनात्मक निरंतर लिहीत राहावे.

[ स्व . गणेश चौधरी व स्व .दिवाकर चौधरी स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी पुरस्कारार्थी कादंबरीकार संतोष जगताप यांचे मार्मिक प्रतिपादन ]

व्यवस्थेत हस्तक्षेप घडत राहतो तो घडण्यासाठीच साहित्यिकांनी प्रबोधनात्मक निर्भयपणे निरंतर लिहीत राहावे .सामान्य शेतकऱ्यांभोवती समस्यांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत गेल्याने त्याच्या शेतीचा श्वास दिवसोंदिवस गुदमरतो आहे. असे मार्मिक प्रतिपादन पुरस्कारार्थी कादंबरीकार संतोष जगताप यांनी केले . लिहीणं माझा छंद नाही हे विनम्रपणे सांगत लिहीण्याची भुमिके बाबत ते म्हणाले, “लिहिण म्हणजे मेंदूत छळणाऱ्या प्रश्नांची उत्तर हुडकून समकालीन भोवतालं समजून घेत मानवी वृत्ती – प्रवृतींचं आकलन मांडणे ” शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या व हवामान बदलांचे गंभीर परिणाम सांगून जगतापांनी उपस्थितांचे मन जिंकले .केशवसुत पारितोषिक प्राप्त कवी स्व. गणेश चौधरी व कादंबरीकार स्व .दिवाकर चौधरी स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार सन २०२० वितरण कार्यक्रम शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे आय . एम .ए . सभागृहात उत्साहात संपन्न झाला . त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जगताप बोलत होते . व्यासपीठावर अध्यक्ष एम .जे . कॉलेजच्या निवृत्त हिंदी विभागाचे प्रमुख प्रा . ए .बी . पाटील असून प्रमुख अतिथी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ .आशुतोष पाटील, कवी बाळकृष्ण पाटील , चंद्रकांत चव्हाण सर, मातोश्री कल्पना चौधरी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ . विवेक चौधरी,तहसीलदार कवी जितेंद्र कुँवर, पुरस्कारार्थी कवी नामदेव कोळी व कादंबरीकार संतोष जगताप, नेत्रतज्ज्ञ डॉ . अंजली चौधरी, सभापती यावल पंचायत समिती पल्लवी चौधरी मान्यवर उपस्थित होते .प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण झाले .प्रास्ताविकात डॉक्टर विवेक चौधरी यांनी सदरहू पुरस्कार श्री गजानन हार्ट ॲन्ड हॉस्पिटल्स तर्फे मागील वर्षापासून पुरस्कृत केले जात आहेत .पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 कालावधीत प्रकाशित झालेले कवितासंग्रह व कादंबऱ्या मागवण्यात आल्या होत्या सदरहू पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले .प्रमुख अतिथींचे स्वागत डॉ . विवेक चौधरी व कुटुंबीयांनी केले .प्रमुख अतिथींचा परिचय पुरुजीत चौधरी ( जिल्हाध्यक्ष, अ .भा . सरपंच परिषद ) यांनी करून दिला.

पुरस्कारार्थी साहित्यिक व पुरस्काराचे स्वरूप…..

सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार वाघुर दिवाळी अंकाचे संपादक तथा सुप्रसिद्ध कवी नामदेव कोळी कडगावकर यांना ” काळोखाच्या कविता ” लिखित काव्यसंग्रहास प्रा . डॉ . आशुतोष पाटील यांच्या हस्ते 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी प्राथमिक शिक्षक संतोष जगताप ( लोणविरे, ता . सांगोला जि. सोलापूर ) यांच्या ” विजेने चोरलेले दिवस ” या कादंबरीस चंद्रकांत चव्हाण सर यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाच्या औचित्याने बाळकृष्ण सोनवणे लिखित ‘ समजूतदार जाणिवांचे कवडसे ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राध्यापक डॉ . आशुतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रमुख अतिथी चंद्रकांत चव्हाण मार्गदर्शनात म्हणाले की, ” कविता आनंदाचं अभिधान व विचारांचं अधिष्ठान असते .पुरस्कारांची उंची सांगण्याची गरज नसते ती साहित्यकृती वाचूनच वाचकांच्या लक्षात येते ” .आजकाल कविता पुरस्कारांभोवती फिरतात याचा खरपूस समाचारही त्यांनी घेतला.
[ बाळकृष्ण सोनवणे लिखित समजूतदार जाणिवांचे कवडसे प्रकाशनाच्या औचित्याने प्रमुख अतिथीचे गौरवोद्गार : –
चंद्रकांत चव्हाण सर
आयुष्याची सुत्रे व जगण्याचे समिकरण सोडवणारी दर्जेदार कविता
प्रा.डॉ.आशुतोष पाटील

  • जगण्याचा भोवताल टिपता टिपता स्व चा अविरत शोध घेणारी व विश्व चैतन्याशी संवाद साधणारी कविता
  • भावना, संवेदना व वास्तवतेची दाहकता याचे प्रत्यय देणारी तसेच सश्रद्धतेने अंतर्मनाची शोध घेणारी कविता .
  • कृषीकेंद्रीत ग्रामजीवनात वाताहत होणार्‍या मूल्य संवादावर भाष्य करणारी कविता ]
    प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉ .आशुतोष पाटील मार्गदर्शनात म्हणाले की, ” सामाजिक जाणिवांचे भरणपोषण महत्त्वाचे आहे परंतू आंतरिक जाणिवांचे भरण-पोषण करण्याची साहित्यिकांना नितांत गरज आहे . कविता वाचकांची संवेदनशीलता व वैचारिक जाणीवेची पातळी उन्नत तथा समृद्ध करणारी असली पाहीजे . वाड़मय व्यवहारात पुरस्कारासाठी पुस्तक छापण्याचा प्रकार सर्रास चाललाय . याबद्दल त्यांनी परखड ताशेरे ओढले . साहित्य लेखन, पुरस्कार प्रक्रिया व वाचकांची भुमिका याबद्दल आशुतोष पाटलांनी मार्मिक बुस्टर डोस दिले.
  • चौधरी कुटूंबियांबद्दल मान्यवरांचे गौरवोद्गार.

प्रा.डॉ.आशुतोष पाटील : -मातापित्यांच्या निःस्वार्थी व तत्वनिष्ठ सामाजिक व राजकीय कार्याचा वारस्याचं रुपांतर व्रत म्हणून डॉ . विवेक चौधरी व पुरुजीत चौधरी राम लक्ष्मणा प्रमाणे कर्तव्यनिष्ठेने निरंतर आचरण करीत पुढे नेत आहेत .

पुरस्कारार्थी संतोष जगताप :- स्वर्गीय दिवाकर दादा चौधरी आपल्या बोलीला आपण मानाचं स्थान दिलं पाहिजे यासाठी सदैव आग्रही होते आणि हा आग्रह त्यांनी लेवा गणबोलीतून लिहून व्रतस्थपणे पाळला .डांभुर्णी सारख्या छोट्या गावाशी आपली नाळ कायम जपत केवळ लिहून न थांबता सामान्य माणसाच्या भल्यासाठी प्रत्यक्ष चळवळीत जगणारे दिवाकर दादा कृतिशील लेखक होते . ]

महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयात अनुवादक असलेले सत्कारार्थी कवी नामदेव कोळी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,”कष्टकऱ्यांच्या व्यथा-वेदनांचे समाजदर्शन पूर्णपणे साहित्यात आलेच नाही म्हणून मी प्रकर्षानं कष्टकऱ्यांच्या जीवनावर लिहिण्याचा ध्यास घेऊन लिहील . कविता हेच कवीचं मनोगत असतं असे मार्मिक प्रतिपादन कोळींनी करीत मजबूरी, शेतमजूराच्या पोरी व सरकारी दवाखाना या कविता भावोत्कटतेने सादर करून उपस्थितांची दाद मिळविली .*मान्यवरांची उपस्थिती* निवृत्त प्राचार्य एस.एस .राणे ,महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखाध्यक्ष प्रा. डॉ.शिरीष पाटील, कवी प्रकाश किनगावकर , महेंद्र सोनवणे,बाल साहित्यिका सौ .माया धुप्पड , सृजनशील चित्रकार राजू बाविस्कर, प्रा . डॉ . सत्यजित साळवे, प्रा . महेंद्र, सोनवणे,तुषार वाघुळदे, भारतरत्न डॉ . अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव जिल्हा प्रमुख विजय लुल्हे , प्रकाश पाटील,अरुण कुमार जोशी, गणेश सुर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, सौ . सरला सोनवणे यांच्यासह मान्यवर रसिक समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात निवृत्त हिंदीचे प्राध्यापक ए.बी . पाटील यांनी स्व . दिवाकर चौधरी यांचा सामाजिक व राजकीय कार्याला उजाळा देत कौटुंबिक सुखद घटनांना उजाळा दिला . चंद्रकांत चौधरी सरांनी मार्गदर्शनात सुगम ओघवत्या शैलीत सकस साहित्य , पुरस्कार प्रक्रियेची मुल्यात्मक पारदर्शकता , वाचकांची भुमिका यावर प्रारंभी भाष्य केल्याने पुढील सर्व मान्यवरांनी सुद्धा आपली याबाबत मते मांडल्याने लेखन वाचन कार्यशाळा झाल्याचा रसिकांना प्रत्यय आला . चंदकांत चौधरींचे भाषण म्हणजेज कार्यशाळेचे बीजभाषण असल्याची नांदी होती ! आभार पुरुजीत चौधरी तसेच सूत्रसंचालन नाट्यकर्मी कवी तथा आकाशवाणी कलावंत मोरेश्वर सोनार यांनी केले .

दैनिक महाराष्ट्र सारथी
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!