भुसावळ मध्ये भाजपा ने केले ‘दिव्य काशी भव्य काशी’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण..आमदार सावकारे थीरकले भजन-किर्तना वर..

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील काशी विश्वनाथधाम कॉरिडोरच्या लोकार्पण कार्यक्रम संपन्न

भुसावळ -दि.13 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील काशी विश्वनाथधाम कॉरिडोरच्या लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला. सदरील “दिव्य काशी भव्य काशी” कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे एलईडी स्क्रीन द्वारा थेट प्रक्षेपणा चा कार्यक्रम आयोजित आला होता.

या भव्य लोकार्पण सोहळ्या च्या थेट प्रक्षेपण च्या सुरुवातीस भक्तिमय भजन-किर्तनाने करण्यात आली. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भजन किर्तनामध्ये तल्लीन होत विशेष उपस्थित आमदार संजय सावकारे शहराध्यक्ष परिक्षित बऱ्हाटे,माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व नूतन उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व उपस्थितांनी ठेका धरला.

सदरील कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे अजय भोळे, शैलेजा पाटील, लक्ष्मण सोयंके, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, विशाल जंगले, खुशाल जोशी, प्रवीण इखनकर , माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, निक्की बत्रा, गिरीश महाजन, अजय नागरानी, सतीश सपकाळे, साकेगावचे उपसरपंच आनंद ठाकरे, धनराज बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, महिला आघाडी अध्यक्षा अनिता आंबेकर, राहुल तायडे,प्रसन्न पांडे, विनोद पचेरवाल, मनोज पिंपळे, शंकर शेळके ,पुंडलिक पाटील, शिशिर जावळे, चंद्रशेखर पाटील, संजय बोचरे, अमित असोदेकर, चेतन सावकारे, लखन रणधीर, गोपीसिंग राजपूत, विजय डोंगरे,सागर जाधव यांच्या सोबतच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!