कोरोना च्या पार्श्वभूमीवर महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव जिल्हा प्रतिनिधी नाना पाटील सर.

दैनिक महाराष्ट्र सारथी च्या प्रतिनिधींनी वृक्ष देऊन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भुसावळ- फैजपूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि अन्य देशातही त्यांचे अफाट कार्य असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या सरळ पद्धतीने शनिवारी साजरी केला. देशात कोरोना मारीचे संकट असताना कोणत्याही खर्चिक तथा भाविकांना कष्टदायक ठरेल असा कार्यक्रम न करता अत्यंत साध्या पद्धतीने महाराजांनी त्यांचा वाढदिवस सतपंथ मंदिर संस्थांनमध्ये साजरा केला सकाळी सात वाजता मंदिर संस्थानच्या शेतात गुरु जगन्नाथ महाराज यांच्या समाधीस्थळावर पूजा करून गुरुवर्य श्री चे आशीर्वाद घेतले त्यानंतर हनुमंत रायाचे दर्शन घेऊन सतपंथ मंदिरात तमिळनाडू येथून आलेले भाविक हरिलाल पटेल यांनी सपत्नीक मारायचे पाद्यपूजन केले यावेळी महाराजांची उपस्थित भाविकांच्या सान्निध्यात बुंदी तुला करण्यात आली या वर्षी महाराजांनी मंदिरात राहूनच सर्व श्रद्धावानांचे शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारले.

शनिवारी दिवसभर धार्मिक राजकीय सामाजिक निसर्ग व पर्यावरणप्रेमी क्षेत्रातील मान्यवरांनी मंदिरात येऊन महाराज यांचे अभिष्टचिंतन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा महिला पर्यावरण सखी मंच चे राज्य समन्वयक नाना पाटील सर व राज्य सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील यांनी महाराजांना वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट दिले .

प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आपण आपल्या परिसरातील बातमी
80875 77520 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवू शकता !
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा..
नाना पाटील सर.
दैनिक महाराष्ट्र सारथी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
80875 77520

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!