बांगलादेश बरोबरील मालिकेतून सकारात्मक गोष्टी समोर आल्या नाहीत -वेड

ढाका,

बांगलादेशाच्या विरुध्द पाच सामन्यांच्या टि-20 मालिका 1-4 ने गमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने म्हटले की या मालिकेतून कोणतीही सकारात्मक गोष्ट समोर आलेली नाही.

बांगलादेशाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने चार आणि मोहम्मद सेफुद्दीनने शेवटच्या टि-20 सामन्या तीन गडी बाद करुन ऑस्ट्रेलिया त्यांच्या सर्वात कमजोर धावसंख्या 62 धावावर बाद करुन 60 धावाने सामना जिंकला.

वेडने क्रिकइंफोला सांगितले की या मालिकेतून कोणतीही सकारात्मक गोष्ट समोर आलेली नाही . विशेष करुन शेवटच्या सामन्यात अपेक्षानुसार संघ खेळू शकला नाही. सत्य हे आहे की आम्हांला फिरकी विरुध्द चांगले होण्याची गरज आहे संघात असे अनेक खेळाडू आहेत आणि त्यांनी अशा वातावरणात चांगली धावसंख्या करण्याची गरज आहे.

वेडने म्हटले की बांगलादेशाचा संघ आपल्या वातावरणात चांगला आहे. त्यांच्या फिरकीनी शानदार पध्दतीने गोलंदाजी केली आणि अतिरीक्त धावा करण्याच्या पध्दतीला शोधले.

त्याने म्हटले की ढाकातील खेटपट्टीवर खेळणे आव्हानात्मक होते. मी खूप क्रिकेट खेळलो आहे परंतु ही खेळपट्टी आंतरराष्ट्रीय टि-20 सामन्याच्या दृष्टिकोणातून आता पर्यंतची सर्वात आव्हानात्मक खे्ळपट्टी आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!