राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रासह रावेर येथे ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाच्या विरोधात एकदिवसीय धरने आंदोलन करण्यात आले.

दैनिक महाराष्ट्र सारथी रावेर विवरे ग्रामीण प्रतिनिधी राहुल राणे

बहुजन विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज दि.१२ जुलै २०२१ रोजी ३५८ तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले, घंटानाद देण्यात आला,

रावेर येथे आज दि.१२ जुलै २०२१ रोजी ३५८ तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले, घंटानाद देण्यात आला,त्यासोबत रावेर तहसील कार्यालयासमोर सुद्धा एकदिवसीय धरने आंदोलन मा ‌.उमेश दांडगे सर (प्रोटाॅन तालुकाध्यक्ष रावेर) यांचे नेतृत्वामध्ये करण्यात आले.

तालुक्यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग आणि ओबिसी या बहुजनांच्या संवैधानिक प्रतिनिधित्व (आरक्षण) शासनाने नाकारल्याच्या विरोधात तसेच संवैधानिक हक्क अधिकार संपविणार्या धोरणांच्या व शासन आदेशाच्या विरोधात तसेच शेतकरी विरोधी, कामगार कायदे विरोधी, विद्यार्थी विरोधी,शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण,कंत्राटी पद्धती ,शिक्षण सेवक,सीएचबी, अंगणवाडी सेविका,डीसीपीएस पेंशन योजना,रोस्टर अंमलबजावणी इत्यादी सर्व १४ मुद्द्यांवर बहुजन विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज दि.१२ जुलै २०२१ रोजी ३५८ तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले, घंटानाद देण्यात आला,त्यासोबत रावेर तहसील कार्यालयासमोर सुद्धा एकदिवसीय धरना आंदोलन मा ‌.उमेश दांडगे सर (प्रोटाॅन तालुकाध्यक्ष रावेर) यांचे नेतृत्वामध्ये करण्यात आले,प्रसंगी राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.मुबारक शहा सर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले, भारत मुक्ती मोर्चा तर्फे मा.नितिन गाढे व रावेर युनिट सह पाठिंबा देऊन सहभागी झालेत प्रसंगी बामसेफ तालुका अध्यक्ष मा.महेंद्र लोंढे सर, उपाध्यक्ष मा.महम्मद तडवी सर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विंगचे मा.जयेश सुरदास सर, भारत मुक्ती मोर्चा चे मा.राहुल सोनवणे सर,सुरेश चिमणकारे सर,अमोल चौधरी सर,मा.सागर नागरे सर, रविंद्र तायडे सर, विशाल तायडे सर,राजु तायडे सर,अक्षय तायडे,चंद्रकांत भालेराव, अजय तायडे,त्र्यंबक बारी, नरेंद्र चौधरी,व इतर कर्मचारी बांधव व सर्व नाॅन कर्मचारी बांधव आंदोलनात सहभागी होते.

प्रतिनिधित्व बचाओ-आरक्षण बचाओ,नौकरी भर्ती -चालु करो,पेंशन योजना-लागु करो, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा विजय असो, अशा घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले,व नंतर मा.नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,अशा प्रकारे हे आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!