धक्कादायक! झोपाळा खेळताना गळफास, पिंपरी-चिंचवडमध्ये 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड शहरात झोपाळा खेळताना गळफास लागून एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी तिचे आई-वडिल घरात नव्हते. खेळता खेळता ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितंलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये एका आठ वर्षीय मुलीचा झोपाळा खेळताना गळफास लागून मृत्यू झाला आहे. रुपीनगर परिसरात 29 ऑगस्टला ही धक्कादायक घटना घडली. सुमैय्या शेख असं मृत मुलीचं नाव असून तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी ती आपल्या बहिणींसोबत घरात खेळत होती. त्याचवेळी खिडकीला पडदा लावण्याच्या लोखंडी पाईपला स्कार्फ बांधून सुमैय्यानं झोपाळा तयार केला. त्यात बसून झोका घेताना अचानक तिला गळफास बसला आणि तिचा श्वास रोखला गेला. बहिणींनी तिच्या गळ्याचा स्कार्फ काढला आणि तिला रुग्णालयात नेलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सुमैय्याचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा सुमैय्या तिच्या बहिणींसोबत घरात होती. इतर बहिणी आतील खोलीत कामात व्यस्त होत्या. तेव्हा सुमैय्या दुसर्‍या खोलीत खेळत होती. खेळता-खेळता झोपाळा बनविण्यात रमली होती. खिडकीला पडदा लावण्याचा जो लोखंडी पाईप होता. त्याला स्कार्फ बांधून तिनं झोपाळा बनविला होता. त्यात बसून ती मनसोक्तपणे झोका घेत होती. पण अचानक असं काहीतरी घडलं की, तो झोपाळा तिच्या जीवावर उठला. तो स्कार्फ तिच्या गळाला असा काय वेढला गेला की, तिचा श्वास रोखला जात होता. तिनं मदतीसाठी आवाज दिला, तिच्या बहिणी धावल्या. तिला वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. तिच्या गळाला वेढलेला स्कार्फ कसाबसा काढण्यात त्यांना यश आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बहिणींनी तिला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चिखली पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!