कोरोनापासून संरक्षण करायचं असेल तर हे नवीन लिंगोस लक्षात ठेवा; मुंबई पोलिसांचं आवाहन

मुंबई

आपल्या हटके आणि अनोख्या टवीटमुळे अनेकदा मुंबई पोलीस चर्चेत असतात. भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना नागरिकांनी पुन्हा एकदा खबरदारी बाळगावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यावर सीपी मुंबई पोलिसांनी एक इंटरेस्टिंग टवीट करत कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी नवीन लिंगोस लक्षात ठेवावं असं आवाहन केलं आहे.

सीपी मुंबई पोलीस या टिवटर अकाऊंटवरुन एक टवीट करताना पोलिसांनी म्हटलं आहे की, आपल्या दैनंदिन जीवनातील लिंगोसचा अर्थ आता बदलत आहे. कोरोनापासून स्वत:चे संरक्षण करायचं असेल तर हे नवीन लिंगोस लक्षात ठेवा.

ओबे प्रोटोकॉल, प्रिकॉशन ओव्हर व्हायरस, मास्क इन अ‍ॅक्शन, फर्स्ट पर्सन सेफ्टी अशा चार प्रकारचे लिंगोस मुंबई पोलिसांनी शेअर केले आहेत. यातून कोरोनाच्या प्रत्येकाने नियमांचे पालन करावं, काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि व्यक्तीच्या किंवा स्वत: च्या सुरक्षेला सर्वात प्राधान्य द्यावं असा संदेश मुंबई पोलिसांनी दिला आहे.

या नव्या लिंगोसच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे बरेच टवीट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबई पोलिसांनी कोरोना संसर्गापासून बचावापासून अनेक गोष्टींबाबत उत्तम टवीट केले आहेत. चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून केलेल्या टवीटचं नेटिझन्सनीही कौतुक केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!