मोहम्मद अझरूद्दीनची अध्यक्षपदावरून उचलबांगडी; कारण आहे गंभीर

हैदराबाद प्रतिनिधी

17 जून

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबित करण्यात आले आहे. अझहरुद्दीनवर मनमानी निर्णय घेणे, हितसंबंधांची माहिती न देणे आणि भ-ष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणी असोसिएशनने अझहरुद्दीनला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. या प्रकरणाच्या आरोपाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो अध्यक्षपदावरुन निलंबित असेल. त्याचबरोबर त्याचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय अझहरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य देखील आहे. हा क्लब बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. याबाबतची माहिती अझहरुद्दीनने असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, अझहरुद्दीन 27 सप्टेंबर 2019 रोजी एचसीएचा अध्यक्ष बनला. त्यानंतर त्याची कारकिर्द सतत वादग-स्त ठरली आहे. त्याआधी अझहरुद्दीनवर 2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाला होता. या प्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. 2012 मध्ये आंध- प्रदेश न्यायालयाने ती बंदी उठवली. त्याआधीच अझहरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द संपली होती. अझहरुद्दीनने भारताकडून 334 एकदिवसीय सामने खेळली आहेत. यात त्याने 9 हजार 378 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावे कसोटीत 6 हजार 215 धावा आहे. यात 22 शतके आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!