पारोळ्यातील शितल अकॅडमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त संभाषण स्पर्धेचे आयोजन..

दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्या कडुन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारोळ्यातील शितल अकॅडमी येथे संभाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पारोळा येथे आज दिनांक ६ डिसेंबर रोजी शितल अकॅडमी येथे महापरीनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यानिमित्ताने शितल अकॅडमी येथे संभाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शितल अकॅडमीतील स्पिकिंग च्या विद्यार्थ्यानी इंग्रजी भाषेतून संभाषण करत उत्कृष्ट अशी माहिती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शितल अकॅडमीचे संचालक रविंद्र पाटील सर तर उपाध्यक्षस्थानी शितल अकॅडमी भारत संस्था व नेपाल संस्था शिक्षक स्टाफ़ स्थायिक असुन अकॅडमी तील सर्व विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.सूत्रसंचालन हर्षदा मॅडम यानी केले.

आपल्या शहरातील बातम्या करिता दैनिक महाराष्ट्र सारथीचे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!