मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन.

जळगाव प्रतिनिधी

दि. 12 – राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर शुक्रवार, 13 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात श्री. श्रीपाद आमले, फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ. पी. सी. प्रा. लि. पुणे हे दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत, श्री. दिलीप ठाकूर, चित्रपट विश्लेषक, मुंबई, हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत तर श्री. रणजीत संजय जोग, मराठी, हिंदी चित्रपट, नाटक अभिनेता हे दुपारी 3.50 ते 4.15 या वेळेत मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर दुपारी 4.15 ते 4.30 या वेळेत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.
या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधि युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!