प्रगती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशाच्या गजरात व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी मनोज भालेराव यांचे कडून

विद्यार्थ्यांना शाळेत पाळवायच्या सूचना देण्यात आल्या. व सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटायझशन करून तसेच टेम्परेचर व ओक्सीमीटर च्या नोंदी करून, सोशल डिस्टंसिंगचे पालन सह विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले.

जळगाव -विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित प्रगती विद्या मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोषात तसेच फुल पुष्प देऊन करण्यात आले.शासनाने निर्देशीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आज शाळा सुरु करण्यात आली. पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्याना शाळेत पाळवायच्या सूचना देण्यात आल्या. व सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटायझशन करून तसेच टेम्परेचर व ओक्सीमीटर च्या नोंदी करून विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करून त्यांना आपापल्या जागेवर बसविण्यात आले.

पहिला दिवस असल्याने त्यांच्याशी परिचय करून घेण्यात आला.व त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यात आला.शाळेत प्रोजेक्टर वर त्यांना बालगीते व गोष्टी दाखवून त्यांचे मनोरंजन करण्यात आले.पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रतिसाद छान मिळाला.विद्यावर्धिनी संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व पालकांशी हितगुज केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून दाखवत समजावून सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!