जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारोळ्यातील मा.पालकमंत्री अण्णासो डॉ.सतीश पाटील यांचा विजय..

दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी  यांचेकडून..

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ ते २०२६ यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर मागासवर्ग या प्रवर्गातून माजी पालकमंत्री अण्णासो डॉ.सतीश पाटील यांनी जिल्हा बँक संचालक पदासाठी निवडणुकीत विजय मिळविला आहे.

याच प्रमाणे मा मंत्री पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी देखील विकास पवार यांना पराभूत करून जिल्हा बँक संचालकपदी निवडून येण्याचा आपला क्रम कायम ठेवला आहे.

आज दिनांक २३ नोव्हेंबर झालेल्या मतमोजणीत डॉ. सतीश पाटील यांना २३१६ तर त्यांचे विरोधक विकास पवार यांना १४२ मते मिळाली.या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवडून आलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर अण्णासो डॉ सतीश पाटील यांच्या पारोळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने ढोल,ताशे व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पारोळा तालुक्यातील बातम्यां करीता दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी -प्रकाश पाटील.. यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!