नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन वाटप

जळगाव (प्रतिनिधी)

दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आमदार जळगाव शहर मा. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी साहेब मा.अभिजीत राऊत उपजिल्हाधिकारी साहेब मा. राहुल पाटील समाज कल्याण अधिकारी दिव्यांग विभाग जिल्हा परिषद मा भरत चौधरी साहेब, सेवाधर्म संस्था अध्यक्ष मा चंद्रशेखर नेवे सेवारत परिवार डॉक्टर रितेश पाटील ,भरारी फाउंडेशन अध्यक्ष मा दीपक परदेशी व नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष मा. मनीषा पाटील नारीशक्ती ग्रुपच्या महिला सखी यांच्या शुभहस्ते शिलाई मशीन वाटप करण्यात आली. सर्व मान्यवरांचे नारीशक्ती ग्रुप तर्फे गुलाबाचे रोप देऊन पर्यावरण वाचवा हा संदेश देत स्वागत करण्यात आले. गरजूंसाठी झटणाऱ्या उपेक्षितांना मदत करणाऱ्या पीडितांचे अश्रू पुसणाऱ्या अनाथ निर्वासितांना पालकत्व देणाऱ्या दिव्यांगामध्ये आत्मविश्वास भरणाऱ्या गरिबांच्या वेदनांवर फुंकर घालणाऱ्या नारीशक्ती ग्रुपचे अभिनंदन आणि कौतुक आपल्या मनोगतातून आमदार राजूमामा भोळे व जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत यांनी केले व सांगितले की समाजाचे आपण देणे लागतो या भूमिकेतून इतर संस्थांनीही पुढे येण्याची आणि असेच समाजोपयोगी कार्य करण्याची गरज आहे.यावेळी शिलाई मशीन वाटप सविता अशोक साळुंके जळगाव दिव्यांग भगिनीला तसेच अनिता सुभाष वंजारी पारोळा,रंजना अभयसिंग पवार पारोळा,लक्ष्मीबाई लक्ष्मण बंजारा शिरपूर, मेघा देविदास निंबाळकर जळगाव या विधवा भगिनींना वाटप करण्यात आले. याप्रसंगी सविता अशोक साळुंके या दिव्यांग भगिनीची स्थिती पाहता तत्क्षणी आमदार राजूमामा भोळे यांनी तिला व्हीलचेअर देण्याचे सांगितले. याप्रसंगी शिलाई मशीन घेण्यासाठी मा.भरत चौधरी साहेब समाज कल्याण अधिकारी दिव्यांग
विभाग, महापौर माननीय जयश्रीताई महाजन,मनिषा पाटील,आरती व्यास ,माधुरी जावळे ,पुष्पा छाजेड
रेणुका दीदी, शशी शर्मा ॲड सीमाताई जाधव ,सुमित्रा पाटील
वैशाली बोरसे व मैत्रिणी,माधुरी शिंपी,भारती कापडे,
जया व्यास ,भावना चव्हाण,नेहल कोठारी,कामिनी धांडे,लीना
पवार,लताताई सोनवणे,डॉ सुहासिनी महाजन,वर्षा ताई पाटील ,रेखा पांगळे यांचे आर्थिक सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले. आभार सुमित्रा पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी नारीशक्ती च्या सर्व भगिनींचे सहकार्य लाभले
Adv सीमाताई जाधव ,Adv वैशाली बोरसे, नेहा जगताप, भावना चौहान, आरती शिंपी ,माधुरी शिंपी, रेणुका हिंगु, नूतन तास खेडकर, माधुरी जावळे ,भारती कापडणे इ उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!