अलका गोविंद पितृभक्त जळगाव यांना “राज्यस्तरीय काव्यलेखन गौरव पुरस्कार”जाहीर….

जळगाव प्रतिनिधी –

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई (रजि.) या संस्थेमार्फत राज्यस्तरीय काव्यलेखन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वर्षभर अक्षरमंच काव्यलेखन समूहात प्रत्येक महिन्याला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले .त्यांनी सादर केलेल्या स्वरचित व उत्तम साहित्याची दखल घेऊन त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे सदर कार्यक्रम पुणे येथे दिनांक ५/१२/२०२१ रोजी संपन्न होणार आहे.या पुरस्कारासाठी त्यांचे पती श्री गोविंद जगन्नाथ पितृभक्त यांचे कृपाशीर्वाद लाभले आहेत .तसेच पितृभक्त परिवार, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांनी विशेष कौतुक केले आहे.त्यांची मुलगी ,जावई,आणि मुलगा यांचा उत्तम पाठिंबा मिळाला आहे म्हणुनच हे यश संपादन केले या पुरस्कामुळे साहित्य क्षेत्रातुन त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
अलका गोविंद पितृभक्त जळगाव.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!