भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे ध्वज अधिकाऱ्यांनी अमेरीकी ताफा कमांडर यांना बहीरीन येथे दिली भेट

नवी दिल्ली 18 AUG 2021

भारतीय नौदलाच्या बहारीन दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे ध्वज अधिकारी

(एफओसीडब्ल्यूएफ), रियर अॅडमिरल  अजय कोचर यांनी अमेरीकी नौदलाच्या 

सेंट्रल कमांड (एनएव्हीसीईएनटी), यूएस 5 वा ताफा आणि कंबाइंड मेरीटाइम फोर्सेस (सीएमएफ) चे कमांडर व्हाइस अॅडमिरल चार्ल्स बी कूपर दुसरे,

 यांची अमेरिकेच्या 5 व्या ताफ्याच्या मुख्यालयात भेट घेतली. 

अमेरिकी नौदल कमांडरांनी भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रमुख दल असल्याचे सांगितले.  त्यांनी कामकाजाच्या पातळीवर संवाद साधून दोन्ही नौदलांच्या विमानवाहू युद्धनौकांच्या कार्याबाबत उत्सुकता दर्शविली. 

लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट चा भाग म्हणून इंधन भरण्यासारख्या सहकार्याबद्दल भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्याचे ध्वज अधिकारी यांनी प्रशंसा केली.

तर भारतीय नौदल सीएमएफ चा एक भाग बनून या क्षेत्रातील कार्यवाहीमधे वाढ करेल असे

अमेरिकी नौदल कमांडरांनी म्हटले आहे. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!