आरोग्य कर्मचारी मारहाणीचा त्र्यंबकेश्वर आरोग्य विभागातर्फे निषेध…

दैनिक महाराष्ट्र सारथी त्रंबकेश्वर प्रतिनिधी पांडुरंग दोंदे

कोविड लसीकरणा दरम्यान आरोग्य कर्मचारी यांना काही नागरिकांनी मारहाण केली. तसेच काही आरोग्य सेविका यांनाही धक्काबुक्की झाली होती. या घटनेचा त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य विभागाने तीव्र निषेध केला आहे

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली आरोग्य केंद्राअंतर्गत पास्ते प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पास्ते येथे दि. 17 सप्टेंबर रोजी कोविड लसीकरणा दरम्यान आरोग्य कर्मचारी सुर्यवंशी यांना तेथील काही नागरिकांनी मारहाण केली. तसेच काही आरोग्य सेविका यांनाही धक्काबुक्की झाली होती. या घटनेचा त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य विभागाने तीव्र निषेध केला आहे. व आरोग्य कर्मचार्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात दि.18 रोजी आयोजित केलेले लसीकरण सत्र आरोग्य कर्मचार्यांनी बंद ठेवले.
डॉ. मोतीलाल पाटील तालुका आरोग्य अधिकारी त्र्यंबकेश्वर यांनी प्रतिक्रीया देताना सांगितले की गेल्या दिड वर्षांपासून कोरोना काळात आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतानाही सिन्नर मध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय असुन भविष्यात अशा घटना घडू नयेत.

यावेळी त्र्यंबकेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोतिलाल पाटील, अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, अमोल बागुल , संजय चव्हाण, प्रमोद मराठे, शकुंतला बेंडकोळी,यांसह आरोग्य सेवक व आरोग्य कर्मचारी उपलब्ध होते.

✍🏻शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी”
आमचा दैनिक “महाराष्ट्र सारथी” या नावाने मराठी अंक सुरू असुन. सदर अंक नाशिक, जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात येतो.
आपल्याकडे आपण केलेले काही चांगले कार्य, लेख, कविता ,माहिती, आयुर्वेद, सौंदर्याविषयी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्या विषयी जनजागृती करायची असल्यास आम्हाला खालील व्हाट्सअप नंबर वर माहिती पाठविल्यास आम्ही मोफत प्रसिद्धी देवु.
सदर लेख बातमी पाठवताना टाईप करून फोटो सह पाठवावे

(पत्रकारितेची आवड असल्यास अवश्य संपर्क साधावा…)

आपला शुभचिंतक*
पांडुरंग भागवत दोंदे .

दैनिक महाराष्ट्र सारथी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी नाशिक

🪀80106 93873

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!