महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तक्रारीव्दारे कचरा फेको आंदोलनाच्या ईशाऱ्या नंतर यावल नगर परिषदला आली जाग….

दैनिक महाराष्ट्र सारथी यावल वार्ताहर

यावल नगर परिषदला आली जाग शहरात युद्धपातळीवर राबविली जात आहे सर्वत्र स्वच्छता मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लिखित तक्रारीव्दारे कचरा फेको आंदोलनाच्या ईशाऱ्या नंतर नगर परिषद आली ॲक्शन मुड मध्ये ही स्वच्छता मोहीमेत सातत्ये असावे नागरीकांनी व्यक्त केल्या नगर परिषदच्या कारभारा विषयी प्रतिक्रीया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी बबन तडवी यांची भेट घेवुन दिनांक २५ मे२०२१ रोजी लिखीत निवेदनाद्वारे शहरातील भुसावळ रोड , सुतारवाडा, फालक नगर ,गंगानगर , जे टी महाजन व्यापारी संकुल व शहरातील विविध क्षेत्रातील स्वच्छता व नालेसफाई पावसाळ्यापुर्वी नाले साफसफाई पावसाळा तोंडावर आला असला ही सफाई होत नसल्याची तक्रार दिली होती आणी जर तात्काळ नगर परिषद शहरात स्वच्छता मोहीम राबविली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वखर्चाने शहरात सफाई अभीयान राबवुन यातुन काढलेला घाण व कचरा नगर परिषदे समोर आणुन टाकेल व कचरा फेको आंदोलन करेल असा ईशारा दिला होता अखेर मुख्यधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेवुन शहरातील विविध भागात युद्धपातळीवर स्वच्छता कार्यक्रमास सुरूवात केली आहे . नगर परिषद प्रशासनाला नागरीकांच्या समस्या व अडचणी सोडविण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी प्रशासनास जागृत करून शहरातील समस्या सोडविण्याबाबत जागृत केल्याबद्दल त्यांचे कौत्तुक होत आहे .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!