पुरातन श्री भिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या संपूर्ण बावीस एकर जागेवर आरक्षण टाकावेे…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव येथे श्री नागेश्वर श्री भिलेश्वर श्री सिद्धेश्वर ही महादेवाची पुरातन देवस्थाने असुन
सदरची देवस्थान हे पंचक्रोशी मध्ये नावाजलेले आहेत.


वरणगाव येथील श्री राम मंदिर रेणुका माता मंदिर गाव देवी तसेच श्री मोठा हनुमान मंदिर इत्यादी देवस्थानच्या मालकीच्या या स्थावर मालमत्ता आहेत
तसेच ठराविक लोकांच्या ताब्यात असलेल्या शैक्षणिक व धार्मिक संस्था सहकारी संस्था सर्वांसाठी खुल्या करून इतरांना सभासद करून घेऊन सर्वसंमतीने कार्यकारी मंडळ निवडण्यात यावे अशी वरणगाव वासीयांकडून आपसात चर्चा करत बोलले जात आहे
वरणगाव येथील पुरातन श्री भिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टची वरणगाव शिवारात गट क्रमांक ८४१ व ८४१/२ या २२ एकर जागेपैकी ०४ एकर जागेवर क्रीडांगणाकरिता आरक्षण टाकलेले आहे

आस्वाद हॉटेल समोरील २२ एकर जागेवर मंदिर परिसरासाठी काही एकर जागा सोडत इतर जागेच्या परिसरात युवा वर्गासाठी खेळाडूंना मैदानी चाचणी स्पर्धेची तयारी करण्यासाठी मैदान हे तयार झाले तर राज्यपातळीवर देश विदेशात खेळाडू आपली चमक दाखवत आंतरराष्ट्रीय पातळीवर वरणगाव शहराचे नाव हे गाजवले जाऊ शकते

व तसेच शाळा कॉलेज आठवडे बाजार फायर ब्रिगेड रुग्णालय पत्रकारांसाठी प्रशस्त मिटिंग हॉल व निवासस्थाने सुशिक्षित बेरोजगारांन करिता व्यापारी संकुल महिला बचत गटाकरीता उत्पादने व विक्री करता जागा तसेच शेतकऱ्यांना त्यांचा पिकवलेला माल साठविण्याकरीता गोडाऊन शीतगृह हरितगृह व विक्रीचे स्टॉल लावले जाऊ शकतात
तसेच फुलबगीच्या जेष्ठ नागरिकांकरिता बालगोपाळां करिता उद्यान निर्मिती हि होऊ शकते
वरणगाव शहरातील सुज्ञ नागरिक सामाजिक संस्था पदाधिकारी युवावर्ग व इतर वयातील ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी या जनहित विषया संदर्भात जागृत होत शासनाला जाब विचारणार का ?
दैनिक महाराष्ट्र सारथी च्या माध्यमातून पत्रकारितेचा

लेखणीतून आपल्या समोर विषय सादर झालेला असुन

वरणगावकर आता गंभीरतेने विचार करत आवाज उठवणार का ?

शहरातील नागरीक कायद्याचे पालन करत काय पाऊल उचलतात याकडे भुसावळ तालुक्यातील इतर गावांतील युवा वर्गासहित इतर नागरिकांचे लक्ष हे लागले असुन परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे

हिच ती वेळ आहे..

या बावीस एकर जागेपैकी काही एकर जागेत वरणगाव शहरातील युवा वर्ग ते व्यावसायिक व्यापारांना लक्षणीय लाभ होणार आहेत

या अनुषंगाने वरणगाव शहरातील एका सुज्ञ नागरिकांने २२ एकर जागेविषयी जनहित विषयाची मागणी करत शासन दरबारी विषय मांडलेला आहे.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!