वसुंधरा जायन्टस सहेली तर्फे गरजु महिलांना किराणा वाटप..

भुसावळ:
वसुंधरा जायंटस सहेलीच्या कोषाध्यक्षा व प्रोजेक्ट चेअरमन मंदाकिनी केदारे यांनी आपल्या नातु संग्राम केदारे व नात स्वरा केदारे याचा वाढदिवसानिमित्ताने बांधकामावरील वाचमन यांच्या कुटुंबियांना किराणा किट वाटप केले.व लहान मुलांना बिस्कीटं व आणि नाश्ता अणि महिलांना साडया वाटप केल्या. याप्रसंगी वसुंधरा जायन्टस सहेलीच्या अध्यक्षा महानंदा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत केले. तसेच उपाध्यक्षा राजश्री बादशहा यांनीही या कार्यक्रमाचे औचित्य कथन केले.
कार्यक्रमाचे वसुंधरा जायंटस सहेलीच्या वर्षा लोखंडे,रुपाली पाटणकर मिना राजपुत, रेखा सोनवणे,भाग्यश्री भंगाळे , अंजली वाघमारे,कविता महाले,अनिता ठाकरे,तिलोत्तमा जावळे,दिपाली अहिरे, दिपीका मेश्राम सोनम गुर्चळ , सारिका फालक,जोत्सना कुलकर्णी,नूतन सपकाळे यांनी संयोजन केले.
प्रास्तविक अलका सपकाळे यांनी केले तर आभार निलिमा पाटील यांनी केले,

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!