वाळू चोरट्यांची दमबाजी…. शासकीय पथकावर हल्याचा प्रयत्न

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

पारोळा – तालुक्यातील करमाड खुर्द परिसरात असलेल्या बोरी नदीच्या पात्रात चोरट्या मार्गाने वाळू तस्करी करणाऱ्यांनी गस्तीवर असलेल्या शासकीय पथकावर आरेरावी करत दमबाजी,शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक १७ रोजी मंगळवारी तहसीलदार अनिल गवांदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बोरीपात्रात गेल्या काही दिवसापासून अवैद्यरित्या वाळू तस्करी चालू होती यानुसार तहसीलदार यांनी चार जणांचे पथक नेमून परिसरात गस्तीसाठी पाठवले यावेळी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पथक गस्त घालत असताना करमाड खुर्द परिसरात असलेल्या बोरी नदीच्या पात्रात विना नंबरचे चार ट्रॅक्टर वाळू भरत होते पथकाला बघताच चालकांनी ट्रॅक्टर जोरात पळविले यावेळी त्यांना थांबण्याचे सांगितले असता एक ट्रॅक्टर थांबले व दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाने पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु पथक वेळीच सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला व दोन ट्रॅक्टर चालक फरार झाले तर राकेश मधुकर पाटील रा करमाड खुर्द ता पारोळा,आनंदा देशमुख रा कुंझर तालुका चाळीसगाव हे व इतर चार इसम लाट्या काट्या घेऊन पथकाच्या दिशेने आले व पथकाला दमबाजी करत शिवीगाळ केली व ट्रॅक्टर मधील वाळू रस्त्यावर उपसून फरार झाले असल्याचे घटना घडली म्हणून याबाबत सुधीर रमाकांत गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध अवैद्य वाळू तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!