राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचा जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी इंद्रजित निकुंभ ऊर्फ राहुल मराठे यांची निवड..

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी कासोदा येथील तरुण व युवा पत्रकार इंद्रजित गुलाब निकुंभ उर्फ राहुल मराठे यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रीय स्वराज्य पक्षाचे सर्वानुसर्वे , राष्ट्रीय अध्यक्ष मा. अँड. श्रीहरी बागल यांचेकडून या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. इंद्रजित निकुंभ ऊर्फ
राहुल भाऊ मराठे हे कासोदयातील ज्येष्ठ व युवा पत्रकार ( महाराष्ट्र शान न्युज पोर्टल ) चैनलचे संपादक म्हणून प्रसिद्धीस आहे. तसेच इंद्रजित निकुंभ ऊर्फ राहुल भाऊ मराठे यांची निवड झाल्यानंतर विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पक्षाचे प्रमुख यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी पक्षाध्यक्ष अँड.श्रीहरी बागल यांचे आभार मानले असून पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून पक्षाला तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांच्या निवडीने सर्वत्र त्यांचे कौतुक होत असुन पुढील वाटचालीसाठी त्यांना समक्ष भेटून, फेसबुक, व्हॉट्सॲप,ट्विटर, इंस्ट्राग्राम अशा विविध प्रसार माध्यमा द्वारे शुभेच्छा देण्यात येत आहेत.

____________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपला विश्वासू
प्रकाश पाटील
पारोळा प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!