चोरवड ता.पारोळा येथील वैयक्तिक भांडणाचा कारणावरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

पारोळा प्रतिनिधी –

सविस्तर वृत्त असे की,

भूषण निंबा पाटील हा वडील निंबा विरभान पाटील,आई जयश्री निंबा पाटील व भाऊ चेतन निंबा पाटील अशा सह राहतो व शेती करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.गावातील भूषण निंबा पाटील यांचे नातेवाईक सचिन भाईदास पाटील व त्यांचे इतर साथीदार मला व माझ्या परिवारा तील सदस्य अशांना गावातील माझे चुलत भाऊ राकेश रमेश पाटील यांच्या सोबत राहण्याच्या कारणावरून नेहमी त्रास देत होते.

दिनांक ११-११-२०२१ रोजी रात्री ९-०० वाजेच्या सुमारास भुषण निंबा पाटील (वय २२) व नितीन सुभाष पाटील हे चुलत भाऊ सचिन छोटू पाटील यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल क्र MH 19 BR 5828 हीचाने पारोळा येथे कामानिमित्त आले असून काम आटपून घराकडे (चोरवड) येत असताना रस्त्यावरती वाघरे ता पारोळा शिवारातील जुन्या पाणी महादेव मंदिरा समोर पारोळा चोरवड रोडवर पाच ते सहा चोरवड गावातील इसमांनी त्यांना अडवून सचिन भाईदास पाटील याने भुषण पाटील व नितीन पाटील यांना मादरचोत तुम्ही त्या राकेश पाटील सोबत राहून जास्त मातीतून गेलेले आहेत मी तुम्हाला वारंवार त्यासोबत फिरू नका असे सांगून तुम्ही ऐकत नाही आज तुम्ही सापडलेले आहात तुमच्या आज खून करून मुडदा पाडतो असे बोलल्याने भुषण पाटील यांनी सागर सुनील पाटील याला फोन करून सदर ठिकाणी वरील लोकांनी अडवले असून तुम्ही लवकर या असे सांगितले म्हणून त्या लोकांना याचा राग आल्याने अनिल उर्फ मुन्ना भाईदास पाटील,जगदीश गोपाल पाटील,विशाल भागवत पाटील,भाईदास सिताराम पाटील,कमलाकर बालू पाटील,सचिन भाईदास पाटील असे लोकांनी मिळून भुषण निंबा पाटील व नितीन सुभाष पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व भुषण यास चाकूने उजव्या हाताच्या दंडावर वार केला व नितीन सुभाष पाटील यास पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील वीस ग्रामची सोन्याची चैन व शर्टाच्या वरच्या खिशातील पाच हजार रुपये हिसकावून,ताब्यातील हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल क्र MH 19 BR 5828 हीला दगड व लोखंडी रॉडने नुकसान केले.

सदर ठिकाणी क्षणातच गावातील नातेवाईक अरुण भास्कर पाटील,सागर सुनील पाटील,सुनील पुंडलिक पाटील व रमेश किसन पाटील आल्याने,त्यांना पाहून वरील आरोपी त्यांच्या मोटारसायकलीने तेथून पळून गेले.भुषण पाटील व नितीन पाटील यांना उचलून खाजगी वाहनाने कुटीर रुग्णालय पारोळा येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी भुषण पाटील यांना प्राथमिक उपचार करून गंभीर दुखापत झाली असल्याने,पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे रवाना केले.

भुषण निंबा पाटील ( वय २२) याचा माहितीवरून वरील आरोपी विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!