लम्पिमुळे गुरांच्या बाजार बंदी आदेशाचे पालन करा अन्यथा गुन्हा दाखल…!

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

सध्या राज्यासह जिल्ह्यात लंपी रोगाने थैमान घातले आहे.यामुळे प्रशासनाने पुढील आदेशपावेतो गुरांच्या बाजारांवर बंदी घातली आहे.म्हणुन पशु व्यापाऱ्यांनी आपले बैल,गाई,वासरे विकण्यास आणू नये तसेच इतर कोणत्याही ठिकाणी बाजार भरवू नये. कोणीही आपले जनावरे विकण्यास आणले कीवा अन्य कुठेही बाजार भरविल्यास त्यांचावर आदेशाचे पालन केले नाही म्हणून कायदेशीर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल असे आवाहन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!