बालदिना निमित्त आरोग्य तपासणी ,फराळ व स्वच्छता पॅक वाटप ,तंबाकु मुक्ती मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन..

पारोळा प्रतिनिधी –

दि १४ नोव्हेंबर उत्रडं ता पारोळा येथे
भारताचे प्रथम पंतप्रधान चाचा नेहरू यांची जयंती देशभरात बालदिन म्हणुन साजरी केली गेली.या औचित्यावर धाबे ता पारोळा जि प शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या माध्यमातुन जि प प्राथ शाळा उत्रड येथे बालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कपिल सदाशिव चौधरी,प्रविण चौधरी,ईश्वर चौधरी ,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष वना महाजन यांच्या दातृत्वातुन बालकांना फराळ,मिठाई व स्वच्छता पॅकचे वाटप केले.

सुदृढ बालक ही राष्ट्राची उद्याची खरी संपत्ती असून डॉ निखिल सुधाकर पाटील (सारबेटेकर एम एस सर्जन पारोळा) यांनी बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी आदिवासी बालकांमध्ये तंबाकुजन्य पदार्थांचे दुष्परिणाम लक्षात आणुन देवुन तंबाकुजन्य पदार्थांची होळीही करण्यात आली.तसेच धाबे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी बालकांना झाडे लावा झाडे जगवा बाबत महत्व पटवुन देवुन सर्वात जास्त ऑक्सिजन देणाऱ्या पिंपळ वृक्षाची रोप भेट दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन कपिल चौधरी ,डॉ निखिल पाटील ,मनवंतराव साळुंखे होते .
प्रस्तावना व सुत्रसंचलन उत्रड शाळेचे मुख्याध्यापक भुषण दगडु पाटील यांनी केले.तर या उपक्रमाला उपशिक्षिका सुजाता शिवदास पाटील व विलास चौधरी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!