पारोळा पालिकेची नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई….

पारोळा प्रतिनिधी –

कर संक्रांतीचा सण अवघ्या काहि दिवसांवर येवून ठेपला असतांना पतंग उडविणाऱ्यां मध्ये मोठा उत्साह वाढला आहे.दरम्यान,पतंग उडवितांना नॉयलॉन मांजामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना ही जिल्हयात मोठया प्रमाणात घडत असताना पारोळा येथे या घटनेला आळा बसावा या साठी पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या शहरातील दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.या मोहिमेत न.पा चे क्षेत्रिय आरोग्य अधिकारी सुभाष थोरात मुकादम सिद्धार्थ इंगळे,शहर समन्व्यम शुभम कणखरें , आरोग्य विभागाचे कर्मचारी कैलास वानखडे,आरिफ शेख, नामदेव भामरे,प्रविण साळी यांनी बाजार पेठेत प्लास्टिक जप्ती व नायलॉन मांजा विक्री बंदीसाठी दुकानांवर जाऊन तपासणी केली मात्र नायलॉन मांजा कुठेही आढळून आला नाही.यावेळी मांजा विकण्यास अथवा ठेवण्यास शासनाने बंदी केली असल्याचे दुकानदारांना सांगीतले तसेच सदर प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अश्या सुचना सुभाष थोरात यांनी केल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!