ग्राहकांनी ऑनलाइन फसवणूकी पासून सावध राहावे – विकास महाजन

पारोळा प्रतिनिधी –

अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे ऑफर देतात त्याकडे ग्राहकांनी आकर्षित न होता दुर्लक्ष करावे,अपूर्ण माहितीमुळे अनेक ग्राहकांची फसवणुक होत असते,सध्या ऑनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी टाळून सावध राहावे असे आवाहन ग्राहक आयोगाचे प्रशासकीय राज्य सदस्य विकास महाजन यांनी केले.तसेच ऑनलाईन खरेदी व प्रत्यक्ष दुकानात जाऊन केलेल्या खरेदीचे फायदे याबाबत मार्गदर्शन करून २०१९ चा नवीन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना अभ्यास व्हावा म्हणून सविस्तर माहिती दिली.

येथील तहसिल कार्यालयात भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी तहसिलदार डॉ.उल्हास देवरे,तालुका अध्यक्ष दिगंबर पाटील,बापू महाजन,गणेश बिचवे,नाना पाटील,बापू मिस्तरी, पी.जी पाटील,केशव क्षत्रिय, विलास वाणी,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे,रेशन दुकानदार अध्यक्ष दिनकर पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, लोणी सरपंच डॉ.कैलास पाटील, सदस्य निलेश पाटील,संजय पाटील,मनोहर पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार डॉ देवरे मार्गदर्शनात म्हणाले की,ग्राहक दिन हा सर्वत्र साजरा करून त्या माध्यमातून नागरीकांना माहिती, मार्गदर्शन तसेच जनजागृती झाली पाहिजे,जेणेकरून ग्राहक जागृत झाला पाहिजे.तसेच ग्राहकांनी आपला हक्क बजावून प्रत्येक वस्तूचे बिल घ्यावे जेणेकरून फसवणूक झाली तर आपल्याला ग्राहक मंचात रीतसर तक्रार करता येऊ शकते व सदर दुकानदारावर कारवाई करून आपण मोबदला घेऊ शकतो. डॉ.कैलास पाटील यांनी कार्यक्रमास अल्प उपस्थितीबद्दल खेद व्यक्त करून सदर कायद्याविषयी नागरिकांमध्ये वेळोवेळी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले.तर दिगंबर पाटील,विश्वास चौधरी,पी जी पाटील यांनी ही आपली मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमात दिवाणजी खानोरे, दिलीप आनंदा सोनकुळे,शेख शकील बेग सलीम बेग,भूषण टिपरे हे पारोळा शहरातील चार तर शिरसोदे येथील नंदाबाई स्वयं सहायता महिला बचत गट संजय अमृतकर या पाच रेशन दुकानदारांना आयएसओ नामांकन प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षक आर बी महाडिक, पुरवठा निरीक्षक व्ही.व्ही.गिरासे गोदाम व्यवस्थापक ए.सी चौधरी, अमोल भावसार यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संजय अमृतकर यांनी तर आभार तहसीलदार डॉ उल्हास देवरे यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!