स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत,प्रेक्षकांचे वेधले लक्ष

पारोळा प्रतिनिधी –

तालुक्यातील मोंढाळे प्र अ येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विश्वास हरि पाटील तसेच प्रमुख पाहूणे सी. एम.चौधरी यांच्या हस्ते तर संस्थेचे चेअरमन,कार्यक्रमाचे अध्यक्ष चतुर बाबुराव पाटील,सचिव पी. ए.पाटील,संचालक मंडळ,म.जु. पे.संघटना दिपक गिरासे,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष यौगेश देवरे,योगेश पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध समाजोपयोगी कार्य करणारे मोंढाळे गावातील मान्यवरांचे संस्थेच्या वतीने शाल- श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन पुरस्कार प्राप्त वनमाला बाळासाहेब पाटील यांचाही सत्कार गटशिक्षणाधिकारी व संस्थेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, बालविवाह वर आधारीत नाटिका, नृत्य विविध कार्यक्रम सादर केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.जेष्ठ कलाशिक्षक दिलीप बडगुजर, वनमाला पवार यांनी कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक एस.ए.देसले, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन केले.सूत्रसंचालन एस. पी.पाटील व एस.ए.देवरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सांस्कृतिक समितीतर्फे भूषण रवंदळे,सुरज देवरे, कांतीलाल भदाणे,विशाल राजपूत,पल्लवी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!