पारोळा शहरात इमारतीसह जलतरण तलावासाठी अडीच कोटी मंजुर….

दैनिक महाराष्ट्र सारथी पारोळा प्रतिनिधी –

पारोळा प्रतिनिधी-पारोळा शहरासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी मंजुर ४ कोटी रूपयांची विकासकामांचा भव्य भुमीपुजन सोहळा संपन्न होवून प्रत्यक्षात कामांना सुरूवात देखिल करण्यात आलेली आहे.या भुमीपुजनांवेळी मा.आबासाहेबांनी नागरीकांना आश्वासित केले होते कि, नगरपरिषदेची एक हाती सत्ता दिल्यास शहरासाठी चारशे कोटींचा निधी आणणार व शहराचा विकास कामे करून पुर्णपणे कायापालट करू.त्याच पार्श्वभूमीवर दिनांक ३ नोव्हेंबर रोजीच्या महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचा शासन निर्णयान्वये पारोळा नगरपरिषद हद्दीत गट नं.२४४/२ (सर्वे नं.३४४ चा भाग) येथे जलतरण तलाव इमारतीसह बांधकाम करणे यासाठी तब्बल अडीच कोटी रूपये निधी मा.आबासाहेबांचा प्रयत्नांनी मंजुर झालेले आहेत.या कामामुळे शहरातील लहान्यांसह तरूणांना पोहोण्यासाठी कायमस्वरूपी एक इमारत कार्यान्वित होणार असुन त्यामुळे जलतरणासाठी आवड निर्माण होवुन शरिरासाठी आवश्यक त्या जलतरण तालिमेसाठी मोठी मदत होणार आहे.तसेच यापुढेही शहरातील मुलभुत व आरोग्यविषयक विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशिल असुन जलतरण तलावापेक्षाही मोठी विकासकामे हाती घेण्याचा मानस असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!