थोरगव्हाण येथे काळभैरव जयंती निमित्त उत्सव सुरू…

दैनिक महाराष्ट्र सारथी युवराज कुरकुरे थोरगव्हाण प्रतिनिधी

थोरगव्हाण येथील श्री काळभैरव जयंती निमित्त काळभैरव मुकुट शोभायात्रेचे आयोजन केले जाते .अतिशय नेत्रसुखद व आनंददायी उत्सव परंपरे प्रमाणे साजरा केला जातो.

थोरगव्हाण तालुका रावेर येथील काळभैरव जयंती निमित्त उत्सव भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने उत्साहात संपन्न होत आहे . मानाचे श्री काळभैरव देवाचे मंदिर प्रथम विधीवत स्वच्छ करण्यात येते व भक्तांनी स्वतः हाताने बनवलेल्या माळांनी सजविण्यात आले. स्वतः फुले आणून श्री तुषार महाजन,श्री चेतन चौधरी,श्री रितेश सपकाळे यांचेसह इतर मित्रपरिवार रात्री उशिरापर्यंत मंदिर सजावट साठी नेहमी पुढाकार घेऊन कार्य करतात. श्री काळभैरव जयंती निमित्त काळभैरव मुकुट शोभायात्रेचे आयोजन केले जाते .अतिशय नेत्रसुखद व आनंददायी उत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. सकाळीच श्री काळभैरव मुकुट सजावट परंपरेप्रमाणे श्री काळभैरव भक्तगण थोरगव्हाण गावचे पोलीस पाटील श्री अरविंददादा झोपे यांचे समक्ष विधिवत सजविण्यात आले. नक्षीकाम ,सजावट साठी कलाशिक्षक श्री एस बी सपकाळे सर तसेच काळ भैरव उत्सव समिती, गावचे पोलीस पाटील श्री अरविंद दादा झोपे, गावचे प्रथम नागरिक श्री सचिनभाऊ भिल , श्री हर्षल संजय पाटील ,श्री राजू कोळी , श्री विजय बाऊस्कर, श्री सतीश भागवत चौधरी, श्री रामदास माळी यांचा पुढाकार होता.

सकाळी दहावाजता श्री काळभैरव मुकुट शोभा यात्रा चावडी पासून सुरू झाली. दीड वर्षापासून आतुरलेल्या समोरील भक्तांनी मनोभावे हात जोडून श्री कालभैरव मुकुटाचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. हा उपस्थित भक्तांसाठी सुवर्णयोग होता. मुकुट घेण्याचा मान श्री प्रमोद गंगाधर रोटे यांना मिळाला. श्री कालभैरव मुकुटा समोर भक्तांचे संरक्षण रिंगण कडे तयार करण्यात आले होते . पारंपारिक वाद्य डफ, ढोल- ताशेच्या निनादात शोभायात्रा सुरू निघाली. वाद्य वाजविण्यासाठी श्री काळभैरव सेवेकरी ग्रामीण व शहरी भागातील तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला. ग्रामपंचायत ,पोस्ट गल्ली, भैरवनाथ वाडा बॉम्बेगल्ली मार्गाने श्री काळभैरव मंदिर येथे येऊन श्री काळभैरव यांना मानाचे मुकुट चढवण्यात आले . गावचे पुरोहित श्री वैभव पुराणिक यांनी विधिवत पूजन करून गावचे पोलीस पाटील श्री अरविंदादा झोपे यांना आरतीचा मान दिला . यांचे शुभहस्ते मानाची आरती झाली, श्री दिनकर पाटील यांनीही सहभाग घेतला .शास्त्रोक्त आणि पौराणिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा संपन्न करण्यात आली .भक्तांनी मनोभावे शिस्तबद्ध दर्शन घेणे सुरू केले. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन उत्सव समितीने दर्शना साठी गर्दीचे योग्य नियोजन केले होते .श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्यावतीने बारा ते पाच या वेळेत भैरवचंडी यज्ञ संपन्न झाला या यज्ञामध्ये मोठ्या संख्येने कालभैरव अष्टक स्तोत्र पठण साठी सहभाग घेतल व श्री कालभैरव यांचा महिमा वर्णन केला यावर्षी चांगला हंगाम येऊ दे, सर्वांना निरामय आरोग्य लाभू दे, इडा पिळा टळो आरोग्य सुख संपन्न नांदो,देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होवो अशी याचना भक्त मंडळीकडून श्री कालभैरव चरणी केली . काळभैरव जयंती निमित्त श्री भैरवनाथ वाड्यात सर्व ग्रामस्थ व पाहुण्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . महाप्रसाद याचा नैवद्य श्री कालभैरव यांना दिला गेला व महाप्रसाद पंगत सुरुवात करण्यात आली. श्री भैरवचंडी यज्ञ यासाठी स्वामी समर्थ सेवेकरी तसेच पंचक्रोशीतील कालभैरव भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री कालभैरव मंदिराजवळ अनेक भक्त मनातील इच्छापूर्तीसाठी मान देतात वजनाच्या बरोबर गुळ ,गोड चुर्मा ,पेढा, बाजरी आणि कळण्याची भाकर संख्येनुसार प्रसाद म्हणून अर्पण करतात. म्हणजे जसा शब्द श्री काळभैरव यांना दिलेला असेल तशी वाजत-गाजत मान देण्याची प्रथा आजही कायम आहे. या दिवशी गावातील भक्त तसेच पंचक्रोशीतून आलेले भक्तगण बाजरीची तथा कळण्याची भाकर आणि वांग्याचे भरीत प्रसाद म्हणून श्री कालभैरव चरणी ठेवत असतात. कोरोना कालखंड लक्षात घेता यावर्षी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने श्री काल भैरव भक्तांनी दर्शन घेतले संसार रुपी भव पाशातून मार्गक्रमण करण्यासाठी सुख ,समाधान,शांती प्राप्त होण्यासाठी श्री काळभैरव भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आठही दिशांनी जो सकल मानवाचे कल्याण ,उद्धार करतो या नैसर्गिक आपत्ती पासून सर्वांचे रक्षण करतो असा पालनहार म्हणजे श्री काळभैरव महाराज होय.आपत्ती कालखंडानंतर भक्तीचा ओघ वाढलेला आहे असे दिसते . गावातील सर्व बलुतेदार या उत्सवात सहभागी होतात व दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री काळभैरव जयंतीच्या दुसऱ्या दिवशी श्री काळभैरव महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यावर्षी प्रगतिशील शेतकरी श्री दिनकर उखर्डू पाटील थोरगव्हाण हे महाप्रसादाचे दाते आहेत. जयंतीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महाप्रसाद घेतल्यानंतर पूर्वसंध्येला श्री कालभैरव यांचे मुकुट विधिवत उतरवण्यात येते . भक्तगण श्री काळभैरव यांचा प्रफुल्लित चेहरा पाहण्यासाठी एकत्र येत असतात. काळभैरव चौकात लहान मुलांसाठी विविध खेळणी, शोभिवंत वस्तू दुकान थाटली गेली. रसवंती, संसार उपयोगी भांडी ,गोड प्रसाद विक्रीची दुकाने लागले आहेत.

आपली बातमी पाठवण्याकरिता आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा

दैनिक महाराष्ट्र सारथी युवराज कुरकुरे

थोरगव्हाण प्रतिनिधी

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!