रानमळा पॅटर्न प्रमाणे वाढदिवस साजरा झाल्यास जळगाव शहर हिरवेगार होण्यास वेळ लागणार नाही महापौर सौ जयश्री ताई महाजन…

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

जळगाव :येथील कोठारी नगरातील समाजसेविका व महिला पर्यावरण सखी मंचच्या जळगाव शहराच्या अध्यक्षा नेहा ताई जगताप यांचे पती संतोष भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन उपस्थित होत्या.
त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या शासनाने रानमळा पॅटर्न राबवावा असा जीआर काढुन त्याची कृती प्रत्यक्षपणे राबवावी .
संतोष भाऊ यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोठारी नगराच्या ओपन स्पेस जागेत वृक्षारोपण करून एक आदर्श उपक्रम समाजाला दाखविला असा उपक्रम जर सर्वांनी जळगाव शहरात केला तर लोक सहभागातूनच जळगाव शहर हिरवेगार बनल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन महापौर जयश्रीताई महाजन यांनी केले .
यावेळी वृक्ष लावताना आपण कोणती काळजी घ्यावी ,भारतीय वृक्ष कोणते लावावेत आपल्या परिसरातील जैवविविधतेला अनुसरून वृक्ष लावावेत आणि त्याचे संवर्धन आणि संगोपन कसे करावे याबद्दल राज्य समन्वयक , महीला पर्यावरण सखी मंच चे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.
सुरुवातीला महापौर यांचे स्वागत शहराध्यक्ष नेहा ताई जगताप यांनी केले, तर शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख शोभाताई यांचे स्वागत महिला पर्यावरण मंच या जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा ताई पाटील यांनी केले.
त्याचबरोबर संतोष भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार गुलाबाचं रोप देऊन राज्य समन्वयक नाना पाटील व सुरेद्रसिंग पाटील यांनी त्यांचा सत्कार केला .
यावेळी कार्यक्रमाला परिसरातील माता-भगिनी पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण करणे ही एक चांगली कल्पना उपक्रम असल्याने जगताप परिवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले,
या कार्यक्रमाला महापौर जयश्रीताई महाजन ,महिला पर्यावरण सखी मंच चे नाना पाटील, राज्य सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख शोभा मावशी चौधरी, जिल्हा कार्याध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच च्या मनिषाताई पाटील तसेच पर्यावरण सखी मंच च्या रेखाताई निकुंभ , रूपालीताई निकुम ,वंदनाताई कोष्टी ‘अलकाताई बागुल , प्रियंका ताई कदम , माधुरी शिंपी त्याचबरोबर संतोष भाऊ जगताप , दिपक शिंपी इत्यादींनी या कार्यक्रमाला सहकार्य करून यांच्या हस्ते चिंच कडुलिंब वड पिंपळ औदुंबर आवळा यांचे वृक्षारोपण करण्यात आले, सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला परिसरातील बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!