हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, – दि. 27 –

केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र राज्यातून बरचढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरीकरीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर / सोलापूर / मुंबई / औरंगाबाद यांचेमार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 ऑगस्ट, 2021 पर्यंत मागविण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले अर्ज दि. 20 ऑगस्ट, 2021 पर्यत संबंधीत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचेकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे श्रीमती शीतल तेली-उगले, वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!