सायकलपटूंनी जपली सामाजिक बांधिलकी…!!

सायकलिस्ट म्हटले की रोजचा नित्यनियम ठरलेला असतो. सायकल घ्यायची आजूबाजूच्या गावावर फिरस्ती काढून मनसोक्त सायकलिंगचा आनंद घ्यायचा पण जळगाव येथील पर्यावरणप्रेमी जळगाव सायकलीस्ट ग्रुप सायकलिंग सोबतच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात. टीम मधील वरिष्ठ सायकलपटू श्री. प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या आईच्या स्मृति प्रित्यर्थ कुसुंबा येथे सायकलने जाऊन दीपस्तंभ मनोबल नवीन प्रक्लपाच्या बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली व देणगी दिली.
श्री. प्रतापराव पाटील जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील नवीन प्रकल्पास भेट व देणगी देण्याचे ठरविले होते. त्यांनी ही कल्पना सायकल मिञ रुपेश महाजन यांच्याजवळ मांडली. संपूर्ण ग्रुप आपण सायकल वर जाऊन प्रकल्पाला भेट देऊ या असे त्यांनी सुचविले. ठरल्याप्रमाणे 21 सायकलपटूंनी सायकलवर आपआपल्या राहत्या घरापासून दीपस्तंभ मनोबल कुसुंबा येथे सायकलिंग करीत पोहचले.
तीन एकर जागेवर बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी आपल्या आईच्या स्मृति प्रित्यर्थ प्रकल्पाच्या बांधकामासाठी 21 हजार रुपयांची देणगी दिली. दिव्यांग, अनाथ वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे, उच्च शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहता येईल ही खरच अभिमानाची आनंदाची बाब आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम दीपस्तंभ करीत आहे आम्ही या कार्याच्या कायम सोबत आहोत अशा भावना श्री. प्रतापराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. सर्व सायकलपटू या कार्यात आपआपल्या परीने योगदान देणार आहेत असे रुपेश महाजन यांनी सांगितले.

यावेळी जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय येरुले, पाटबंधारे विभागाचे उप अभियंता विनोद पाटील, महेश सोनी, डी जे शिवा, रुपेश महाजन, सुनील चौधरी, संभाजी पाटील, आशिष पाटील निषांक फिरके, इरफान पिंजारी, सौ.कामीनी काळे धांडे, डॉ.अनघा चोपडे, अतुल सोनवणे, उज्जवल पडोळे, म्रुगांक निशाणदार, मयूर जैन, सौ.पुनम रणदिवे, प्रा. अजय पाटील, प्रा.दिपक दलाल, प्रा.तायडे, राम घोरपडे, मोतीलाल पाटील, सखाराम ठाकरे, अनुप तेजवानी या सर्व सायकलपटुंचे स्वागत करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ रवी महाजन, डॉ.रुपेश पाटील , श्री परेश भाई शहा, तेजस कावडिया, लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!