सायकलीने पारोळ्याचा युवक निघाला तिरुपती दर्शनाला….

चेतन पाटील याचा सत्कार करताना श्री साई हॉस्पिटलचे संचालक डॉ.संभाजीराजे पाटील

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

पारोळा येथील श्री बालाजी महाराजांचे निस्सीम भक्त चेतन पाटील हा चक्क सायकलीने तीरुपती येथील श्री बालाजी महाराजांच्या दर्शनाला निघाला असुन चौदाशे किमीचे अंतर २३ ते २५ दिवसात सायकल प्रवासाने पुर्ण करणार आहे.
दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता २८ वर्षीय चेतन विलास पाटील यांनी श्री बालाजी महाराजांचा मंदिरात जाऊन दर्शन घेत सायकल ची पुजा केली.त्यास श्री बालाजी स्वयंसेवकांकडून भक्तीमय गीताच्या व डि जे च्या तालावर रथ चौक,नगरपालिका चौक, तलाव गल्ली मार्गी कजगांव रस्त्यावरील मारूती मंदिरावर दर्शनाने निरोप देण्यात आला. मागिल वर्षी ही येथील श्री बालाजी भक्त घनश्याम साहेबराव ठाकरे यांनी तिरूपती सायकल यात्रा केली होती तर चेतन पाटील यांनी ही संकल्पना करून तिरुपती दर्शनासाठी सायकल यात्रा प्रवास सुरु केला आहे. त्यांचा चाळीसगांव,कन्नड, संभाजीनगर,बीड,तुळजापुर, कर्नाटक,आंध्र प्रदेश असा प्रवास असणार आहे.या वेळी त्यांना गांवाच्या वेशी पर्यंत निरोप देण्यासाठी रावसाहेब भोसले, केशव क्षत्रिय,श्रीकांत शिंपी, संभाजी पाटील,अमोल पाटील, विलास पाटील,महेश पाटील, दिनेश गुजराथी,सोनु चौधरी, भरत मराठे,प्रितम पाठक,भैय्या पाटील,कुणाल पाटील,पप्पु ठाकरे,छोटू डहाके,घनश्याम ठाकरे,अमोल भावसार,मन्नसाराम चौधरी,निंबा मराठे,गुणवंत चौधरी,छोटू चौधरी आदींसह नागरीक सहभागी झाले होते. दरम्यान,कजगांव चौफुलीवर साई हॉस्पीटलचे संचालक डॉ. संभाजीराजे पाटील यांनी चेतन पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करीत पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!