हिवरखेडे शिवारात हिंस्र प्राण्यांच्या संचार….

हल्ल्यांत दोन प्राणी ठार ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

तालुक्यातील हिवरखेडे खुर्द शिवारात हिंस्त्र प्राण्याचा संचार असल्याने गावातील विजय ताथु पाटील यांची गुरूवारी एक वासरी तर शुक्रवारी गोरख यादव पाटील यांची गाय या हिंस्त्र प्राण्यांनी फस्त केली आहे.या हल्ल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे गावात, परिसरात रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नये,जनावरे शेतातुन घरी घेऊन यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी देसले यांनी केले आहे.दरम्यान वनविभागाचे प्रेमराज सोनवणे, सविता पाटील,रामदास वेलसे यासह वनपाल,वनमजूर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता मिळालेला पायांचा ठशावरून बिबट्या,तळस यासारखे हिंस्त्र प्राणी असू शकतात असे मत वर्तविले आहे. सदर शेत शिवारालगत जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा हैदोस घातला आहे.या भागात रानडुक्कर,हरिण, तडस, राणघोडे,रुई आदी प्राण्यांचा संचार असल्याने जीवाचे संरक्षण व पिकांचे रक्षण व्हावे यासाठी संबंधित विभागाकडून उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!